भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेस १७ डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे . या मालिकेपूर्वी दोन्ही संघाची उत्तम तयारी सुरू आहे. अनेक दिग्गज या मालिकेपूर्वी वेगवेगळे आंदाज व्यक्त करत आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू शेन वॉर्न यांनी भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ निवडला आहे.
मॅथ्यू वेड व मार्कस हॅरिस करणार डावाची सुरुवात –
अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर व युवा विल पुकोवस्की हे दोघेही दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहेत , तसेच जो बर्न्स हा फलंदाज सराव सामन्यात अपयशी ठरल्याने सलामीचा प्रश्न ऑस्ट्रेलियासाठी आणखीनच गंभीर बनला आहे. वॉर्नने यावर उपाय सुचवत आपल्या संघात मॅथ्यू वेड व मार्कस हॅरिस यांना सलामीला ठेवले आहे. वेड हा मागील काही वर्षांपासून कसोटी संघात मध्यक्रमात फलंदाजी करत होता. वॉर्नने मात्र सर्वांना अचंबित करत त्याचावर सलामीची जबाबदारी दिली आहे.
कॅमरून ग्रीनचा समावेश –
वॉर्नने आपल्या संघात युवा अष्टपैलू कॅमरून ग्रीनचा देखील समावेश केला आहे. ग्रीनने सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया A संघाकडून खेळताना भारत A संघाविरुद्ध उत्तम फलंदाजी करत शतक झळकावले होते.दुसऱ्या सराव सामन्यात बुमराने मारलेला चेंडू थेट ग्रीनच्या डोक्यावर आदळल्याने तो सामन्यातून बाहेर झाला होता. जर ग्रीन दुखापतीतून सावरला नाही तर त्याच्या ऐवजी शाॅन मार्श ला संधी देण्यात यावी असेही वॉर्नने सूचित केले आहे.
असा आहे वॉर्नचा संघ –
वॉर्नने आपल्या ट्विटर अकाउंट वर ऑस्ट्रेलियन संघात कोणते खेळाडू असावेत हे स्पष्ट केले आहे. वॉर्नने खालील खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे .
१) वेड २) हॅरिस ३) लबुशाने ४) स्मिथ ५) हेड ६) ग्रीन ७) पेन ( कर्णधार , यष्टिरक्षक) ८) कमिंस ९) स्टार्क १०) लायन ११) हेजलवूड.
संबधित बातम्या:
– दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडची वेस्ट इंडिजवर मात, टेस्ट रँकिंगमध्ये पटकावला हा क्रमांक
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– काय सांगता! आजच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना टाय