ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याचे ४ मार्चला आकस्मित निधन झाले. त्याच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या वॉर्नला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्याचे निधन झाल्याचे समजते. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे निधन ह्रदयविकाराच्या झटक्यानेच झाले आहे आणि यामध्ये कसलीच शंका नाही. वॉर्नच्या निधनाच्या काही तासांपूर्वी काय घडले याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. अशात आता एक नवीन माहिती समोर आली आहे.
शेन वॉर्न (Shane Warne) याला शेवटच्या काही तासांमध्ये जिवंत पाहणाऱ्यांमध्ये ४४ वर्षीय परशुराम पांडे (Parshuram Pandey) यांचाही समावेश आहे. वॉर्नने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी साधारणतः चार तास आधी पांडे आणि दिग्गज लेग स्पिनरची भेट झाली होती. वॉर्नचे निधन ज्या प्रायवेट विलामध्ये झाले, त्याठिकाणापासून थोड्याच अंतरावर परशुराम पांडेंचे टेलरींगचे दुकान आहे.
डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार निधनाच्या दिवशी म्हणजेच ४ मार्चला दुपारी एकच्या दरम्यान, शेन वॉर्न ब्रायोनी टेलर्स या दुकानात गेला होता. या दुकानात तो यापूर्वीही आला होता. याआधी २०१९ मध्ये वॉर्नने याच दुकानातून १० सूट विकत घेतले होते. तेव्हापासून वॉर्न आणि परशुराम पांडे यांची ओळख होती.
परशुरम पांडेंनी डेलीमेलशी बोलताना सांगितले की, शेन वॉर्न त्यादिवशी जेव्हा आला, तेव्हा खूप खुश होता. कारण तो मोठ्या काळानंतर थायलंडमध्ये आला होता. तो जेव्हा दुकानात पोहोचला, तेव्हा परशुरामची गळाभेटही घेतली. असे असले तरी, पुढच्या चार तासांमध्ये वॉर्नच्या निधनाची बातमी समोर आली. पांडेंनी सांगितल्याप्रमाणे, वॉर्न एक चांगला ग्राहक होता आणि ते स्वतः वॉर्नचे चाहते होते. थायलंडमध्ये वॉर्नसोबत जे मित्र होते, त्यांच्यातील एकाने याच ठिकाणी एक सूट बुक केला होता. दिग्गजाच्या निधनाने परशुराम पांडेही निराश आहेत.
दरम्यान, वॉर्न त्याच्या काही मित्रांसोबत थालंडमध्ये सुट्टा घालवण्यासाठी पोहोचला होता. मृत्यूच्या एक दिवस आधीच ते याठिकाणी दाखल झाले होते आणि पुढचे अनेक दिवस याच ठिकाणी घालवणार होते. माध्यमांतील वृत्तानुसार वॉर्न त्याच्या खोलील बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्यानंतर त्याचे मित्र आणि नंतर वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्याचा जीव वाचला नाही.
महत्वाच्या बातम्या –
PHOTOS: राजस्थान रॉयल्सने नव्या रंगात नव्या ढंगात केली सरावाला सुरूवात
इंग्लंडचा ७ विकेट्सने धुव्वा उडवत वेस्ट इंडिजने भारताला केले टेकओव्हर, गुणतालिकेत ‘या’ स्थानी कब्जा
BREAKING| एका वादग्रस्त कारकिर्दीची अखेर! श्रीसंतची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती