शुक्रवारी (०४ मार्च) ‘फिरकीचा जादूगार’ शेन वॉर्न (Shane Warne) याचा आकस्मिक मृत्यू (Shane Warne Died) झाला. तो ५२ वर्षांचा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० हून अधिक विकेट्स घेणाऱ्या वॉर्नने हृद्यविकाराच्या झटक्याने (Shane Warne Died Of Heart Attack) जगाला अलविदा केला. वॉर्न मृत्यूवेळी थायलँडमधील कोह सामुईमध्ये होता आणि त्याच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. यानंतर आता त्याच्या व्यवस्थापकाने काही खुलासे केले आहेत.
त्याने असे म्हटले आहे की, वॉर्न जास्त दारू पिणारा व्यक्ती नव्हता. थाईलँडच्या व्हिलामध्ये जिथे त्याचा मृत्यू झाला, तिथे वॉर्नने दारूचे अजिबात सेवन केले नव्हते. याउलट तो डायटिंगवर (Shane Warne Was On Diet) होता, कारण त्याला त्याचे वजन कमी करत फिट व्हायचे होते. (Shane Warne’s manager throws light on legend’s ‘ridiculous’ diet plans leading to his death)
वॉर्नला ज्या हॉस्पिटलमध्ये नेते गेले होते, त्या हॉस्पिटल्या संचालकांनी सांगितले आहे की, वॉर्न हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. थाई इंटरनॅशनल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक दुल्याकित विट्टायाचनायपोंगने सांगितले की, “वॉर्नला ४५ मिनिटे सीपीआर देण्यात आला होता. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला आहे की, रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी मृत्यू झाला होता.”
यानंतर दारू आणि इतर व्यसनांमुळे वॉर्नला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा आकस्मिक मृत्यू झाला, असे म्हटले जात आहे. परंतु त्याचा व्यवस्थापक जेम्स एर्स्किनने या अफवांना खोटे असल्याचे सांगितले आहे.
एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राशी बोलताना वॉर्नचा व्यवस्थापक म्हणाला की, “तो सुट्टीवर होता. आराम करत होता. परंतु यादरम्यान तो दारू पित नव्हता. कारण त्याला त्याचे वजन कमी करायचे होते, त्यामुळे तो डाइटिंगवर होता. मृत्यूच्या काही तासांपूर्वीच त्याचे १४ दिवसांचे डायट पूर्ण झाले होते. त्याला जास्त दारू पिण्याची सवय नव्हती. सर्वांना वाटते की, त्याला व्यसनाची खूप सवय होती. परंतु तो मुळात असा नव्हताच. मी त्याला एकदा एक दारूची बॉटल गिफ्ट केली होती. त्या गोष्टीला १० वर्षे उलटून गेली आहेत आणि अजूनही ती बॉटल तशीच त्याच्या घरी आहे.”
शेन वॉर्नचे असे झाले आकस्मिक निधन
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि सर्वकालीन महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. वॉर्नच्या व्यवस्थापकांनी एक संक्षिप्त विधान प्रसिद्ध केले आहे. ज्यात, ‘थायलंडमधील कोह सामुई येथे शेन वॉर्नचे निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला.’ असे निवेदनात म्हटले आहे.
‘शेन वॉर्न अटॅक आल्याने घरामध्येच पडला होता. वैद्यकीय कर्मचारी आणि स्टाफने त्याच्यावर घरातच उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वॉर्नने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय कर्मचार्यांनी सर्वोत्तम प्रयत्न करुनही त्याला वाचवता आले नाही.’ असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विन कसोटीतील महान भारतीय गोलंदाज बनण्याच्या वाटेवर, ४ विकेट्स घेत कपिल देवची केली बरोबरी
भारीच! स्नेह राणा-पुजा वस्त्राकर जोडीची पाकिस्तानविरुद्ध कमाल, एकाच वेळी दोन विश्वविक्रम नावावर