---Advertisement---

महिलांच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीपूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केली ‘ही’ विशेष मागणी

On: मंगळवार, जुलै 6, 2021 10:58 AM
---Advertisement---

काहीदिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाला तब्बल ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती. नुकताच भारतीय महिला संघाने इंग्लंड महिला संघाविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता. यानंतर आता येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील एकमात्र कसोटी सामना खेळायचा आहे. तत्पूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकारीने एक विशेष मागणी केली आहे.

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यात येत्या ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय महिला संघाचा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. अशातच बीसीसीआयची वरिष्ठ अधिकारी शांता रंगास्वामी यांनी मागणी केली आहे की, या ऐतिहासिक कसोटी सामन्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात यावी, ज्यामध्ये गुलाबी चेंडूचा वापर केला जावा. (Shanta rangaswami demands pink ball practise match before Indian women’s vs austrelian women’s pink ball test match)

भारतीय संघाची माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांचे म्हणणे आहे की, कोरोना महामारीमुळे देशांतर्गत क्रिकेट सामने  खेळवले गेलेले नाही. त्याची भरपाई जशी पुरुष क्रिकेटपटूंना मिळाली आहे. तशीच महिला क्रिकेटपटूंना देखील मिळावी. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, जेव्हा सर्व काही सुरळीत होऊन जाईल तेव्हा,’भारतीय अ’ संघाचा दौरा देखील व्हायला हवा. याबाबत बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, आम्हाला त्यांच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यावर कशी अंबलबजावणी करायची ते आम्ही पाहू.

शांता रंगास्वामी यांनी आपल्या पत्रात लिहिले की, “बीसीसीआयच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.” भारतीय संघ पर्थमध्ये गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळणार आहे. याबाबत बोलताना शांता रंगास्वामी यांनी म्हटले की, भारतीय संघाला सराव करण्याची आवश्यकता आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, ‘बीसीसीआयने २०१८ नंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये जास्त दिवस खेळले जाणारे सामने खेळवणे बंद केले आहेत. त्यामुळे आमच्या महिला संघातील खेळाडूंना लाल चेंडूने खेळण्याची संधी मिळालीच नाही. परंतु संपूर्ण श्रेय भारतीय संघाला जाते, त्यांनी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात उत्कृष्ट लढत देत सामना अनिर्णीत केला. तसेच पर्थमध्ये खेळण्यापूर्वी भारतीय संघाला सराव करण्याची आवश्यकता आहे.’

महत्वाच्या बातम्या-

भज्जीच्या सर्वकालीन सर्वोत्तम संघात तेंडुलकर, धोनीला स्थान; मात्र, एकेकाळच्या सर्वात जवळच्या संघसहकाऱ्याकडे दुर्लक्ष

हे पोरगं वेगळंच आहे!! एकीकडे संघसहकारी सुट्ट्यांची मजा घेत असताना सिराज करतोय इंग्लंडच्या रस्त्यांवरील पायऱ्यांवर सराव

‘लंका दहन’ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज; सराव सामन्यात ‘या’ खेळाडूंनी घातला धुमाकूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---