---Advertisement---

इथेही पवारांचाच हात.! मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचा फोन अन् टीम इंडियाचं विमान मुंबईत लँड, वाचा सविस्तर

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 2:22 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा खेळाडूंनी भरलेल्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफी पटकावली आहे. यानंतर जगात विजयाचा डंका वाजवून सर्व भारतीय खेळाडू मायभूमीत परतले आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतात आलेल्या या खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे का नाही?, यावरुन गोंधळ उडाला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे भारतीय खेळाडूंना क्वारंटाइनमधून विशेष सूट मिळाली आहे.

शरद पवारांचा मुख्यमंत्र्याना फोन

माध्यमांतील वृत्तानुसार, यापुर्वी अशी चर्चा होती की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतल्यानंतर नियमानुसार भारतीय खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. परंतु शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत फोन करत चर्चा केली आणि खेळाडूंना क्वारंटाइनच्या नियमातून सूट देण्यात यावी अशी विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तसे निर्देश मुंबई महापालिकेला दिले, अशी माहिती पुढे येत आहे.

आपापल्या घरामध्ये रहावे लागणार क्वारंटाइन

यानुसार स्वदेशी पतरलेल्या भारतीय खेळाडूंच्या मुंबई विमानतळावर कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये न ठेवता आपापल्या घरी परत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी, सर्व खेळाडूंना घरी कमीतकमी ७ दिवस एकांतवासात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अजिंक्य रहाणेसह हे खेळाडू परतले भारतात 

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, सलामीवीर रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर हे मुंबईत दाखल झाले आहेत. सोबतच भारतीय कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याचेही मुंबईत आगमन झाले आहे. या सर्वांचे मुंबईच्या विमानतळावर जोरदार स्वागतही करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हादेखील दिल्ली येथे पोहोचला आहे.

 

शरद पवारांनी दिल्या होत्या शुभेच्छा

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत भारताने ३ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर माजी आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाला शुभेच्या दिल्या होत्या.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ट्विट करत लिहले होते की, “ऑस्ट्रेलिया संघावर मिळवलेल्या विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन. भारतीय क्रिकेटसाठी आजचा विजय निश्चितच ऐतिहासिक आहे. ब्रिस्बेनमध्ये ३२ वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर गाबा येथे विजय मिळवला. वेल डन.”

महत्त्वाच्या बातम्या-

Video : ढोल-ताशांच्या गजरात ‘कर्णधार’ अजिंक्य रहाणेचं मुंबईत पारंपरिक पद्धतीने स्वागत

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर ‘हिटमॅन’चं भारतात आगमन, फोटो तूफान व्हायरल 

“मी आणि संघ खूप आनंदी आहोत”, बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून मायदेशी परतलेल्या पंतची पहिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---