---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर ‘हिटमॅन’चं भारतात आगमन, फोटो तूफान व्हायरल 

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 12:35 PM
---Advertisement---

शुक्रवार (१९ जानेवारी) रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने ३ विकेट्सने ऑस्ट्रेलियावर मात करत २-१ च्या फरकाने मालिका जिंकत दौऱ्याचा गोड शेवट केला. यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे खेळाडू मायदेशी परतण्यासाठी निघाले आहेत.

नुकताच भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा भारतात परतला आहे. न्यूज एजन्सी एएनआयने ट्विटरवर रोहितचे मुंबई विमानातळावरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रोहित करड्या आणि काळ्या रंगाचे मिश्रण असलेला टि-शर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स घातली असल्याचे दिसत आहे. सोबतच त्याने टोपी घातली असून चेहऱ्यावर मास्कही लावलेले आहे. त्याच्या आजूबाजूला पोलिस असल्याचे दिसत असून ते सुरक्षितपणे रोहितला विमानतळाबाहेर नेत असल्याचे दिसत आहे.

भारतीय क्रिकेट रसिकांनी रोहितच्या या फोटोंना चांगलीच पसंती दर्शवली आहे. या फोटोला गेल्या दोन तासाभरात ५ हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

रोहितबरोबरच कर्णधार अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि संघ प्रशिक्षक रवी शास्त्री हेदेखील भारतात परतले आहेत. तसेच बॉर्डर गावसकर ट्रॉफी विजयाचा नायक ठरलेला रिषभ पंत याचेदेखील भारतात आगमन झाले आहे.

रोहित शर्माची कसोटी मालिकेतील कामगिरी

आयपीएल २०२० दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याद्वारे त्याने भारतीय संघात पुनरागमन केले होते. या सामन्यातील दोन्ही डावात सलामीला फलंदाजी करताना त्याने २६ आणि ५२ धावांची खेळी केली होती. तर महत्त्वपुर्ण अशा ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटी सामन्यात ५१ धावांचे योगदान दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी आणि संघ खूप आनंदी आहोत”, बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून मायदेशी परतलेल्या पंतची पहिली प्रतिक्रिया

समाजाला महत्त्वपुर्ण संदेश देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वापरलं पुजाराचं उदाहरण, ट्विट व्हायरल

“शेवटी आई-वडील हे..” ब्रिस्बेन कसोटीतील गिलचे शतक हुकल्याने वडील नाराज, विरूने दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---