---Advertisement---

याला म्हणतात क्रिकेटप्रेम! आयपीएलनं नाकारलेला ‘हा’ खेळाडू इंग्लंडकडून काऊंटी खेळणार

---Advertisement---

भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर काउंटी चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या टप्प्यात एसेक्सकडून खेळेल. शार्दुलने काउंटीमध्ये खेळण्यासाठी एसेक्ससोबत करार केला आहे. शार्दुल ठाकूर एप्रिल आणि मे दरम्यान सात सामन्यांसाठी उपलब्ध असेल. तो पहिल्यांदाच काउंटी क्रिकेट खेळणार आहे. त्याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने शेवटचा सामना 2023-24 च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर खेळला होता.

आयपीएल मेगा लिलावात शार्दुल विकला गेला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. सध्याच्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने 21.67 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत आणि 400 हून अधिक धावा केल्या आहेत.

एसेक्ससोबत करार करण्याबाबत ठाकूर म्हणाला, “या उन्हाळ्यात एसेक्समध्ये सामील होण्यास मी उत्सुक आहे. वैयक्तिकरित्या, हे माझ्यासाठी माझी प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी नवीन संधी आणि आव्हाने घेऊन येईल. काउंटी क्रिकेट खेळण्याची माझी नेहमीच इच्छा होती आणि मला आनंद आहे की मी या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.”

एसेक्सचे क्रिकेट संचालक ख्रिस सिल्व्हरवुड म्हणाले: “आम्ही शार्दुल ठाकूरला करारबद्ध करण्यास खूप उत्सुक आहोत. आमची योजना स्पष्ट होती की आम्हाला एका उच्च दर्जाच्या वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे जो खालच्या फळीतही फलंदाजी करू शकेल.”

हेही वाचा-

बाप लेक मैदान गाजवणार! मुलासह देशासाठी खेळणार ‘हा’ खेळाडू? निवृत्तीपासून यू-टर्न
‘हे’ 3 स्टार फिरकीपटू चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये आपल्या संघासाठी ठरणार ‘एक्स-फॅक्टर’
WPL: मुंबईचा शानदार विजय, गुजरातचा 5 विकेट्सने उडवला धुव्वा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---