---Advertisement---

शार्दुल ठाकुरचे ‘हे’ छुपे टॅलेंट पाहिले का? रोहित शर्माच्या मुलीसाठी गायले खास गाणे

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 7:31 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील २ कसोटी सामने झाले आहे. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. तर, दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला तब्बल १५१ धावांनी नमवत मालिकेत ०-१ ने आघाडी घेतली. त्यानंतर आता दोन्ही संघ तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागले आहेत.

तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ लीड्सला रवाना झाला आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि संघातील इतर सदस्य आपल्या परिवारासोबत बसमध्ये बसलेले आहेत.

यादरम्यान, रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून भारतीय संघाच्या प्रवासादरम्यानचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. खेळाडूंना त्यांच्या परिवारातील सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी मिळाली आहे. यात सर्वजण खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.

पहिल्या फोटो स्टोरीमध्ये रोहित शर्मा आपल्या तोंडावर जॅकेट घेऊन निवांत झोपलेला दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओ स्टोरीमध्ये शार्दुल ठाकुर एक गाणं म्हणत आहे. रोहित शर्माची मुलगी समायरा वडिलांसोबत खेळत असताना ठाकूरच्या या गाण्याला देखील चांगलीच एन्जॉय करत आहे. तर तिसर्‍या फोटो स्टोरीमध्ये ठाकूरचा बसमध्ये खाली झोपलेला एक फोटो आहे. अशाप्रकारे रितीकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रवासादरम्यानचे काही क्षण शेअर केले आहेत.

Photo Courtesy: Instagram/RitikaSajdeh

दरम्यान, भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात तयारीला लागलेला आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्समधील हेडींग्लेच्या मैदानात २५ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. भारतीय संघाने लॉर्ड्सचे मैदान गाजवले होते. यामुळे भारतीय संघ या मालिकेत ०-१ ने आघाडीवर आहे. तर इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटी सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.तसेच इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांचा १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे. ज्यामध्ये डेविड मलानला यावेळी संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीने करारबद्ध केलेल्या सिंगापूरच्या ‘त्या’ फटकेबाजाची ‘ही’ आहे खासियत
हेडिंग्ले कसोटी पंत, विराट, रूट यांच्यासाठी ठरू शकते विक्रमी; ‘हे’ मोठे पराक्रम करण्याची आहे सुवर्णसंधी
अमेरिकेचा संभाव्य क्रिकेट संघ, ‘हे’ दोन भारतीय असू शकतात सलामीवीर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---