पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज चॅम्पियनशीप सिरीज 18वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात संप्रित शर्मा, ओंकार शिंदे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत छत्तीसगढच्या संप्रित शर्माने चौदाव्या मानांकित महाराष्ट्राच्या अथर्व बिराजदारचा 9-1 असा तर, महाराष्ट्राच्या ओंकार शिंदेने दहाव्या मानांकित नमित मिश्राचा 9-6 असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या लढतीत अर्णव बनसोडेने अनन्मय उपाध्यायचा 9-7 असा संघर्षपूर्ण पराभव केला. नवव्या मानांकित दिव्यांक कवितके व ऋषिकेश चितळे यांनी अनुक्रमे श्री राऊत व ईशान मेरू यांचा 9-5 अशा सारख्याच फरकाने पराभव केला.
निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
अर्णव बनसोडे(महा)वि.वि.अनन्मय उपाध्याय(महा)9-7;
आर्यन घाडगे(महा)वि.वि.निमय महाडिक(महा)9-3;
संप्रित शर्मा(छत्तीसगढ)वि.वि.अथर्व बिराजदार(महा)[14] 9-1;
ऋषिकेश चितळे(महा)वि.वि.श्री राऊत(महा)9-5;
दिव्यांक कवितके(महा)[9] वि.वि.ईशान मेरू(महा)9-5;
यश पोळ(महा)वि.वि.साईराज श्रोत्री(महा)9-1;
देवेश वाधाइ(महा)वि.वि.सनय सहानी(महा)9-2;
अयान गिरधर(महा)[13] वि.वि.देवेन चौधरी(महा)9-2;
आदित्य रानवडे(महा)वि.वि.देव तुराकिया(महा)9-4;
ओंकार शिंदे(महा)वि.वि.नमित मिश्रा(महा)[10] 9-6;
अनिकेत रॉय(उत्तरप्रदेश)[6]वि.वि.अंश जैन(महा)9-0.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो, पण…’, आरसीबीच्या कर्णधाराने सांगितली कुठे झाली चूक
सतत ऑस्ट्रेलियाला नडणारा मास्टर ब्लास्टर…