---Advertisement---

IPLच्या पहिल्या हंगामातील ऑरेंज कॅप विजेत्या मार्शचा क्रिकेटला अलविदा, आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच माजवली होती खळबळ

On: रविवार, जानेवारी 14, 2024 11:10 AM
Shaun Marsh Retirement
---Advertisement---

Shaun Marsh Retirement: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज शॉन मार्श याने 2001 पासून सुरू झालेल्या आपल्या शानदार कारकिर्दीला अलविदा म्हणत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी (13 जानेवारी) बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न डर्बीमध्ये रेनेगेड्सला विजय मिळवून देणारी नाबाद 64 धावांची खेळी केल्यानंतर ही घोषणा केली. मार्शने सांरितले की, 17 तारखेचाचा सिडनी थंडरविरुद्धचा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. 40 वर्षीय मार्शने आयपीएलच्या पहिल्या सत्रात ऑरेंज कॅपही जिंकली होती. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पणही केले नव्हते. (shaun marsh has announced his retirement from professional cricket)

शॉन मार्श (Shaun Marsh) याने आयपीएल 2008 नंतर ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. आपल्या 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत या डावखुऱ्या फलंदाजाने 38 कसोटी, 73 वनडे आणि 15 टी-20 सामने खेळले. त्याने कसोटीत 34 च्या सरासरीने 2265 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे 41 च्या सरासरीने 2773 धावा केल्या. तर टी20 मध्ये त्याच्या बॅटमधून 255 धावा निघाल्या. मार्शने कसोटीत 6 आणि एकदिवसीय सामन्यात 7 शतके झळकावली आहेत. त्याने श्रीलंकेत पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले होते. (Marsh who won the Orange Cap in the first season of the IPL bid farewell to cricket before making his international debut)

हेही वाचा

आयपीएल सर्वांसाठी खास; यातूनच टी20 विश्वचषक संघ निवडला जाईल, इंदोर टी-20पूर्वी शिवम दुबेचे वक्तव्य
‘जितेश-सॅमसन रोहित शर्माची पहिली पसंती नाहीत?’ माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले धक्कादायक कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---