---Advertisement---

नाव काढल पोरीने! अवघ्या सतराव्या वर्षी शेफाली वर्मा खेळणार ‘ही’ प्रतिष्ठीत स्पर्धा

On: गुरूवार, मे 13, 2021 8:20 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रतिभावंत युवा आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा ही प्रथमच भारताबाहेर एका व्यवसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसेल. जगातील सर्वोत्तम महिला टी२० लीग असलेल्या वुमन्स बिग बॅश लीगमध्ये ती सिडनी सिक्सर्स संघाचे प्रतिनिधित्व करेल. वुमन्स बिग बॅश खेळणारी ती अवघी चौथी भारतीय महिला क्रिकेटपटू बनेल.

बीसीसीआय सुत्रांनी दिली माहिती
शेफाली आगामी वुमन्स बिग बॅश लीगमध्ये खेळणार या बाबतची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तो अधिकारी म्हणाला, “शेफाली वर्मा ही आगामी वुमन्स बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स संघासोबत करारबद्ध झाली आहे. स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. शेफालीसोबत फिरकीपटू राधा यादव हिच्यासोबत देखील सिडनी सिक्सर्स संघ व्यवस्थापन चर्चा करत आहे. शेफाली कमी वयाची असल्याने यासाठी तिच्या पालकांची परवानगी आवश्यक असेल.”

शेफाली पूर्वी या स्पर्धेमध्ये भारतीय महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही सिडनी थंडर्स, सलामीवीर स्मृती मंधाना ब्रिस्बेन हिट व अष्टपैलू वेदा कृष्णमूर्ती होबार्ट हरिकेन्स संघासाठी खेळली आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी आहे शेफाली
सध्या केवळ १७ वर्षाची असलेली शेफाली सध्या आंतरराष्ट्रीय महिला टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. मागील वर्षी झालेल्या महिला टी२० विश्वचषकात तिने चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शेफाली बिग बॅशपूर्वी जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ ही स्पर्धा खेळेल. यामध्ये ती बर्मिंघम फिनिक्स संघाचे प्रतिनिधित्व करेल. शेफालीने आत्तापर्यंत २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना १४८.३१ अशा धडाकेबाज स्ट्राईक रेटने ६१७ धावा कुटल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द होऊनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळणार १०० कोटींहून अधिक रक्कम, ‘हे’ आहे कारण

स्टीव स्मिथला मिळणार ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद? टीम पेनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

‘हे’ आहेत जगातील सर्वात जास्त मानधन घेणारे क्रिकेटपटू; पहिल्या पाच जणांत नाही विराट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---