---Advertisement---

शिखर धवनचा मोठा कारनामा; ‘हा’ रेकॉर्ड करणारा बनला जगातील पहिलाच क्रिकेटर

On: रविवार, एप्रिल 11, 2021 6:57 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १४ व्या हंगामाला शुक्रवार, दिनांक ९ एप्रिल २०२१ पासून सुरुवात झाली आहे. या हंगमातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामध्ये फलंदाज शिखर धवनचे मोठे योगदान आहे. शिखर धवनने या सामन्यामध्ये २ षटकार आणि १० चौकारांसह ८५ धावा केल्या. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला १८९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखरने शानदार अर्धशतक झळकावले. यासह त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ६०० चौकार मारण्याचाही पराक्रम केला आहे. हा कारनामा करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही क्रिकेटपटूला आयपीएलमध्ये ६०० चौकार मारता आले नव्हते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत त्याच्यापाठोपाठ ५१० चौकारांसह डेव्हिड वॉर्नर आणि तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली ५०७ चौकारांसह आहे.

दिल्लीने केले आव्हान पूर्ण 

प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी वैयक्तिक अर्धशतके करताना १३८ धावांची सलामी भागीदारी रचली. शिखर धवनने ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी केली तर पृथ्वी शॉने अवघ्या ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले.

त्यांच्या या भागीदारीनंतर रिषभ पंतने नाबाद १५ आणि मार्कस स्टॉयनिसने १४ धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ आणि ड्वेन ब्रावोने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा २५ वर्षांपूर्वी वेंकटेश प्रसाद पाकिस्तानी क्रिकेटरला म्हटला होता ‘मी इंदिरानगरचा गुंडा आहे’, ट्विट होतय व्हायरल

केकेआर विरुद्ध हैदराबाद: कोण ठरणार वरचढ? पाहा दोन्ही संघांची ‘ही’ आकडेवारी

सीएसकेच्या काळजीत भर, ‘हे’ २ खेळाडू आगामी सामन्यास मुकणार; प्रशिक्षकांनी दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---