बुधवारी (२८ जुलै) भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघामध्ये दुसरा टी-२० सामना पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन करत ४ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह ही मालिका १-१ ने बरोबरीत आली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरीही कर्णधार शिखर धवनने विराट कोहलीला मागे टाकत एक नवीन कीर्तीमान आपल्या नावावर केला आहे.
कोहलीला मागे टाकत गाठले अव्वल स्थान
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनने ४२ चेंडूत सर्वाधिक ४० धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर त्याने कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडून काढला आहे. शिखर धवन आता श्रीलंका संघाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
त्याने ११ टी-२० सामन्यातील १० डावात ४१.६६ च्या सरासरीने ३७५ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने या संघाविरुद्ध ७ सामन्यातील ६ डावात ८४.७५ च्या सरासरीने एकूण ३३९ धावा केल्या आहेत. या दरम्यान विराटने ८२ धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. तर शिखर धवनने ९० धावांची सर्वाधिक खेळी केली आहे.(Shikhar Dhawan becomes most highest rus scorer against srilanka in T20I)
श्रीलंका संघाविरुद्ध टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
शिखर धवन :३७५
विराट कोहली :३३९
केएल राहुल :२९५
रोहित शर्मा :२८९
सुरेश रैना :२६५
या यादीतही विराटला सोडले मागे
शिखर धवन टी-२० क्रिकेटमध्ये ८ वेळेस ४० धावा करून बाद झाला आहे. या यादीत त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ७ वेळेस ४० धावा करून धावा करून बाद झाला आहे. या यादीतही शिखरने कर्णधार विराट कोहलीला पछाडले आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ४० धावा करून बाद होणारे फलंदाज
शिखर धवन :८
विराट कोहली :७
एमएस धोनी :५
सुरेश रैना :५
महत्त्वाच्या बातम्या-
Video: विकेट मिळाल्याने चाहरचे डोळे दाखवत आक्रमक सेलिब्रेशन, लंकन फलंदाजानेही टाळ्या वाजवत…
कोहलीच्या चेल्याची कमाल! टी२० पदार्पणात स्लॉग स्वीप शॉट खेळत लगावला गगनचुंबी षटकार