महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच भारतीय संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तसेच आज (२६ मार्च) होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला दिग्गज खेळाडूंना मागे टाकत विश्वविक्रम करण्याची संधी असणार आहे.
पहिल्या वनडे सामन्यात शिखर धवनने ९८ धावांची आक्रमक खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३१७ धावांचा डोंगर उभा केला होता. तर अवघ्या २ धावांनी धवनचे शतक हुकले होते. या सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कार देखील पटकावला होता. अशातच आज होणाऱ्या सामन्यात त्याला सौरव गांगुली आणि केन विलियम्सन या फलंदाजांना मागे टाकण्याची संधी असणार आहे.
या सामन्यात त्याला वनडे क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. त्याला अवघ्या ९४ धावांची गरज आहे. जर त्याने हा कारनामा दुसऱ्या वनडे सामन्यात केला तर तो विराट कोहलीनंतर सर्वात जलद ६००० धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरू शकतो.
कर्णधार विराट कोहली या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने १३६ डावांमध्ये ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तसेच जर शिखर धवनने आज ९४ धावा केल्या तर, तो १३८ डावात असा कारनामा करणारा फलंदाज ठरेल. तसेच तो न्यूझीलंड संघाचा फलंदाज केन विलियम्सनला देखील मागे सोडणार आहे. विलियमसनने ६००० धावा १३९ डावात पूर्ण केल्या होत्या.
तसेच तो माजी फलंदाज सौरव गांगुली याला देखील मागे टाकू शकतो. सौरवने १४८ डावात हा कारनामा केला होता. तसेच वनडेमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारा धवन १० वा भारतीय फलंदाज ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रनमशीन’ विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी; सचिन, पाँटिंगच्या विश्वविक्रमांची करु शकतो बरोबरी
INDvENG: दुसऱ्या वनडेत इंग्लंडने जिंकली नाणेफेक; पाहा कुणाला मिळाली जखमी श्रेयस अय्यरच्या जागी संधी
असा क्रिकेटपटू ज्याने, आठ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर सिनेसृष्टीत आजमवले नशीब; धोनीवरही केले होते आरोप






