आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (5 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगला. आयपीएल इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब संघाने 5 धावांनी थरारक विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने नाबाद अर्धशतकी खेळी केली. यासोबतच त्याने आयपीएलमधील एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पंजाबच्या सलामीवीरांनी 10 षटकात 90 धावांची सलामी दिली. कर्णधार शिखर धवन याने राजस्थानच्या गोलंदाजांना जेरीस आणले. धवनने आपल्या कारकिर्दीतील 48 वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 56 चेंडूवर 86 धावांची खेळी केली. यामध्ये 9 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. या अर्धशतकासोबतच त्याने एका खास विक्रमाच्या यादीत आपले नाव नोंद केले.
Shikhar Dhawan completed 50 "fifty plus" score in IPL history.
One of the finest ever in this league. pic.twitter.com/5QdrwpdX4N
— Johns. (@CricCrazyJohns) April 5, 2023
शिखरच्या आयपीएल कारकिर्दीतील ही 50 पेक्षा जास्त धावांच्या खेळीची 50 वी वेळ होती. यामध्ये 48 अर्धशतक व 2 शतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये अशा प्रकारची कामगिरी केवळ विराट कोहली व डेव्हिड वॉर्नर हेच करू शकले आहेत. विराटच्या खात्यावर 45 अर्धशतक व 5 शतके जमा आहेत. तर, वॉर्नरने तब्बल 60 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्यात. वॉर्नरच्या नावे 56 अर्धशतके व 4 शतके जमा आहेत.
या सामन्याचा विचार केला गेल्यास राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर व गिल या जोडीने 90 धावांची भागीदारी केली. यामध्ये या दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली. इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानानंतर पंजाबने 197 पर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झालेली. मात्र, कर्णधार संजू सॅमसनने 42 धावा करत संघाला पुनरागमन करून दिले. अखेरीस हेटमायर व ध्रुव जुरेलने आक्रमक खेळ दाखवत संघाला विजयी लक्षाच्या जवळ नेले. मात्र, करनने अखेरचे शतक उत्कृष्ट रित्या टाकत संघाला पाच धावांनी विजय मिळवून दिला. पंजाबसाठी एलिसने 5 बळी मिळवले.
(Shikhar Dhawan Complete 50th 50 Plus Score In IPL Only After Kohli And Warner)