झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरूवारी (१८ ऑगस्ट) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यजमान संघावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली. १९० धावांचा पाठलाग करताना शिखर धवन व शुबमन गिल यांनी नाबाद अर्धशतके ठोकत संघाला विजय मिळवून दिला. आपल्या याच अर्धशतकी खेळीदरम्यान संघाचा उपकर्णधार शिखर धवनने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये ६५०० धावांचा टप्पा पार केला.
झिम्बाब्वेने दिलेल्या १९० धावांचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर शिखर धवनने जबाबदारी घेतली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत ११३ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ८१ धावांची खेळी केली. विजयी फटका त्याच्याच बॅटमधून आला.
शिखरने या खेळीदरम्यान वनडे क्रिकेटमध्ये ६५०० भावांचा टप्पा गाठला. त्याने १५३ डावात हा पल्ला पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला व विराट कोहली यांच्यानंतर सर्वात वेगात त्याने ६५०० धावा पूर्ण केल्या. त्याने आतापर्यंत भारतासाठी १५६ वनडे खेळताना ६५७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १७ शतके ३८ अर्धशतके झळकावली आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या दीपक चहर, अक्षर पटेल व प्रसिद्ध कृष्णा त्यांनी प्रत्येकी तीन बळी घेत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. इवान्स व नवागारा यांनी नवव्या गड्यासाठी ५६ धावा जोडून संघाला १८९ पर्यंत नेले. प्रत्युत्तर धवन व गिल यांना बाद करू शकणारा चेंडू झिम्बाब्वेचा एकही गोलंदाज टाकू शकला नाही. अखेरीस भारताने ३०.५ षटकात विजय साकारला. दीपक चहर याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच
थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श
सोलापूरचा महेंद्र पुन्हा चमकला! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पठ्ठ्याने मारले सिल्वर