भारत विरुद्ध श्रीलंका या संघांमध्ये नुकतीच वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका पार पडली आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली तर, श्रीलंका संघाला टी-२० मालिका आपल्या नावावर करण्यात यश आले. तसेच ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील काही खेळाडू भारतात परतले आहेत. दरम्यान भारतीय कर्णधार शिखर धवन हा राजस्थानमध्ये मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसून आला आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
लेकसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपुरमध्ये सध्या पर्यटकांची खूप गर्दी आहे. भारतीय पर्यटकांसह अनेक परदेशी पर्यटक देखील इथे भेट देण्यासाठी येत असतात. काही दिवसांपूर्वी सायना नेहवाल आणि पंकज अडवाणी यांनी इथे हजेरी लावली होती. यानंतर आता शिखर धवनने देखील सुट्टी घालवण्यासाठी उदयपूर या पर्यटन स्थळाची निवड केली आहे. उदयपूरच्या महाराणा प्रताप विमानतळावर पाऊल ठेवताच चाहत्यांनी त्याला पूर्णपणे घेरले होते. दरम्यान शिखरने चाहत्यांसह सेल्फी देखील काढले.
#Udaipur : क्रिकेटर @SDhawan25 पहुंचे उदयपुर
महाराणा प्रताप एयरपोर्ट पर फैन्स के साथ खिंचवाई फोटो, 2 दिन तक उदयपुर में ठहरने का बताया जा रहा कार्यक्रम, श्रीलंका के दौरे पर गई टीम इंडिया के कप्तान थे धवन@udaipurupdates #RajasthanNews h pic.twitter.com/4BMkbJ5gNO
— Udaipur Update (@udaipurupdates) July 31, 2021
त्याने आपल्या यात्रेतील काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याला भारतात परतल्यावर किती आनंद झाला आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोला काही तासातच तीन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच चाहते आपल्या प्रतिक्रिया देताना देखील दिसून येत आहेत. (Shikhar Dhawan instagram post went viral on social media)
https://www.instagram.com/p/CR_1l3qKFGI/?utm_medium=copy_link
येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित हंगामाला प्रारंभ होणार आहे. शिखर धवन हा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तो येत्या काही दिवसात ही स्पर्धा खेळण्यासाठी युएईला रवाना होणार आहे. गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर दिल्ली कॅपिटल्स संघ १२ गुणांसह सर्वोच स्थानी विराजमान आहे. त्यांनी आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी ८ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना ६ सामने जिंकण्यात यश आले होते. तर २ सामने गमावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत पाकिस्तानी फलंदाजाचा टी२०त ‘विश्वविक्रम’, रोहित-धवनलाही पछाडलं
आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या आपल्या दोन्ही भारतीय शिष्यांचे मॅकग्राने केले अभिनंदन, म्हणाला…
अबब! पंड्या बंधूंनी मुंबईत घेतला ३० कोटींचा अलिशान फ्लॅट, ‘या’ बॉलीवुड ताऱ्यांचे होणार शेजारी