जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील सामने चांगलेच रंगतदार होऊ लागले आहेत. अटीतटीच्या होणाऱ्या या सामन्यात अनेक खेळाडू आपला दमदार खेळ दाखवतायेत. भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. धवनच्या धमाकेदार कामगिरीनंतर दिल्ली कॅपिटल्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मोहम्मद कैफने ट्विट करून त्याचे कौतुक केले आहे.
कैफने केले धवनचे कौतुक
शिखर धवन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संमिश्र कामगिरीनंतर आयपीएलमध्ये दाखल झाला आहे. पहिल्या तीन सामन्यात धवनने आक्रमक फटकेबाजी करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला देण्यात येणारी ऑरेंज कॅप आपल्या नावे केली आहे. धवनच्या या फॉर्मविषयी कौतुक करताना दिल्लीचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मोहम्मद कैफने ट्विट केले आहे.
कैफने लिहिले, ‘धवन असा दुर्मिळ फलंदाज आहे जो निर्भयपणे क्रिकेट खेळतानाही अतिशय दृढ दिसतो. जोखिम न पत्करताही तो स्ट्राईक रेटशी तडजोड करत नाही. ही एका महान टी२० खेळाडू चिन्हे आहेत. गब्बर आयपीएलचा सुपरस्टार आहे.’
@SDhawan25 is the rare batsman who looks solid even while playing fearless cricket. Cutting risks without compromising the strike-rate is the mark of a great T20 batsman. Gabbar is an IPL Super Star. pic.twitter.com/OUFTNCQpDq
— Mohammad Kaif (@MohammadKaif) April 19, 2021
धवनची हंगामाच्या सुरवातीला दमदार कामगिरी
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा सलामीवीर शिखर धवन हा या आयपीएलमध्ये उत्कृष्ट फार्म दिसतोय. धवनने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या हंगामातील पहिल्या सामन्यात ८५ धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यानंतर, पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातही त्याने ९२ धावा फटकावून ऑरेंज कॅप आपल्याकडे घेतली. सध्या धवने २०२१ आयपीएल हंगामात खेळलेल्या ३ सामन्यात ६२ च्या सरासरीने १८६ धावा बनविल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’
‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!
नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?