कोणत्याही फलंदाजासाठी एकापाठोपाठ सलग दोन सामन्यात अर्धशतकी, शतकी किंवा द्विशतकी खेळी करणे ही मोठी गोष्ट असते. तर याउलट सलग २ सामन्यात गोल्डन डकसह (शून्यावर बाद) मैदानाबाहेर जाणे ही खूप लज्जास्पद गोष्ट मानली जाते. तसे तर, जगप्रसिद्ध आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात आजवर कोणत्याही फलंदाजाला सलग २ शतके आणि त्यानंतर २ वेळा गोल्डन डक होताना आपण पाहिलेले नाही. परंतु आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनसोबत मात्र असे घडले आहे.
शनिवारी (३१ ऑक्टोबर) दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा ५१ वा सामना झाला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि धवन सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले.
मात्र मुंबईच्या ट्रेंट बोल्टने सूर्यकुमारच्या हातून धवनला झेलबाद केले. त्यामुळे धवन केवळ २ चेंडूत शून्य धावांवर पव्हेलियनला परतला. महत्त्वाचे म्हणजे, दिल्लीच्या मागील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही धवन शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे आयपीएलच्या सलग २ सामन्यात शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
एवढेच नव्हे तर, धवनने आयपीएल २०२० मधील सलग २ सामन्यात शतके लगावली होती. त्याने पंजाबविरुद्ध नाबाद १०६ धावा आणि त्यापूर्वीच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात नाबाद १०१ धावा केल्या होत्या. यासह तो आयपीएल इतिहासात सलग २ शतके ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला.
मात्र आता एकापाठोपाठ सलग २ सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सलग २ शतके आणि सलग २ वेळा शून्यावर बाद होण्याचा ऐतिहासिक विक्रम त्याने नावावर केला आहे.
धवनने त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत १७२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ शतके आणि ३९ अर्धशतके करत ५०५० धावांची नोंद केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
दुष्काळात तेरावा महिना ! हैदराबादचा ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
‘हा’ खेळाडू बनू शकतो तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू, गंभीरची भविष्यवाणी
कमाल लाजवाब राहूल! आयपीएलमध्ये अनोखी कामगिरी करत विराट कोहलीच्या विक्रमाची केली बरोबरी
ट्रेंडिंग लेख-
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला
IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश