भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने मुरली विजयबरोबरच्या कसोटी क्रिकेटबद्दलच्या जून्या आठवणी शेअर केल्या आहेत. धवने म्हटले की, तो चांगला व्यक्ती आहे. मी त्याला माझी पत्नी म्हणतो. याव्यतिरिक्त धवनने हेदेखील सांगितले की, विजयला समजून घेण्यासाठी तुम्हाला शांत आणि ध्यैर्यशील रहावे लागेल.
धवनने विजयला म्हटले आपली पत्नी-
धवनने (Shikhar Dhawan) इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत आर. अश्विनबरोबर चर्चा केली. यावेळी तो म्हणाला की, “मैदानावर आणि मैदानाबाहेर विजय (Vijay Shankar) एक शानदार व्यक्ती आहे. मी त्याला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. तो खूप प्रेमळ आहे. तो नेहमी म्हणतो की ‘मी असा नाही, तसा नाही. मी एक बिंधास्त व्यक्ती आहे.’ त्यावेळी मी त्याला म्हणतो की तू माझ्या पत्नीसारखा (Wife) आहे.”
“आम्ही जर कधी धाव घेण्यासाठी पळालो नाही तर थोडा शाब्दिक वाद होतो. परंतु लगेच सर्वकाही ठीक होते. त्याला समजणे खूप कठीण आहे. त्यासाठी शांत आणि सहनशील असले पाहिजे,” असेही तो पुढे म्हणाला.
धवनने ठोकले होते पदार्पणाच्या सामन्यात शतक-
धवनने मार्च २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावांची खेळी केली होती. त्यादरम्यान त्याच्याबरोबर विजय खेळत होता. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी २८९ धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे विजयनेदेखील त्या सामन्यात १५३ धावा केल्या होत्या. यानंतर दोघांनी अनेक सामने सलामीला एकत्र फलंदाजी केली. या खेळीनंतर धवन भारतीय संघातील नियमित सदस्य बनला होता.
इंग्लंडमध्ये खराब कामगिरीमुळे विजयला संघातून वगळण्यात आले होते. सध्या धवनदेखील संघातून बाहेर आहे. त्याची जागा रोहित शर्माने (Rohit Sharma) घेतली आहे. पृथ्वी शॉनेदेखील (Prithvi Shaw) काही सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. तरीही परिस्थिती पहाता धवन आणि विजयचे संघात पुनरागमन होणे कठीण दिसत आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेकठिकाणी क्रिकेटच्या सामन्यांच्या आयोजनावर बंदी आहे. त्यामुळे क्रिकेटपटू इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या माध्यमातून लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधत आहेत. अशाप्रकारे चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्याची संधी मिळत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लॉकडाऊनमध्ये कोच रवी शास्त्री यांची शमीकडे ‘अजब’ मागणी