---Advertisement---

कमालच! ‘गब्बर’ शिखर धवनचा दिसला अनोखा अंदाज, बासरी वाजवतानाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शनिवार, मे 22, 2021 12:33 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो बासरी वाजवताना दिसत आहे.

आयपीएल 2021 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर तो सध्या घरी परतला आहे. आगामी जुलैमध्ये भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. तेव्हाच थेट धवन मैदानात खेळताना दिसू शकेल.

शिखर धवनने बासरी वाजविणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “आत्म्यासाठी संगीत. शांत रहा आणि सकारात्मक रहा”. तसेच त्याने चाहत्यांना प्रश्न देखील विचारला की, हे गाणे कोणते आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता का? धवनच्या या बासरी वादनाला चाहत्यांनी देखील खूप पसंती दिली आहे आणि लोक या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

https://www.instagram.com/p/CPIaU-PJlZm/

आयपीएल 2021 मध्ये धवन अविस्मरणीय फॉर्ममध्ये होता. ही स्पर्धा 29 सामन्यांनंतर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी रद्द केली जाईपर्यंत त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूची ऑरेंज कॅप जिंकलेली होती. धवनच्या या शानदार कामगिरीमुळेच दिल्ली कॅपिटल्स संघाने गुणतालिकेत प्रथम क्रमांक मिळवला होता.

धवनने आयपीएल 2021 दरम्यान अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याने 8 सामन्यात 134.28 च्या शानदार स्ट्राइक रेटने 380 धावा केलेल्या होत्या. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके देखील झळकावली होती. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले होते. दिल्लीच्या या शानदार कामगिरीचे सर्वात मोठे श्रेय क्रिकेट पंडितांनी धवनला दिलेले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘द्रविड भारताला सर्वोत्तम बनवू इच्छित होता, पण अनुभवी खेळाडूंनी साथ दिली नाही’ चॅपेल यांचा खळबळजनक दावा

वर्ल्डकप २०२२ च्या क्वालिफायरसाठी भारतीय फुटबॉल संघ पोहचला दोहा येथे; सुनील छेत्रीचे पुनरागमन

दोन देशांसाठी खेळणारा क्रिकेटपटू झाला निवृत्त; भारताविरुद्ध मात्र मिळाला नाही एकही बळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---