भारतीय संघाने नुकतीच इंग्लंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता येत्या १२ मार्च पासून इंग्लंड संघाविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच भारतीय संघातील क्रिकेटपटू गेल्या काही महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे अधून मधून ते विरंगुळ्यासाठी विविध गमती जमती करत असतात. त्यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून बायो बबलमध्ये खेळत आहेत. सतत बायो बबलमध्ये राहिल्यामुळे खेळाडूंवर मानसिक तणाव येऊ शकतो. हा तणाव कमी करण्यासाठी भारतीय खेळाडू किड्स जोनमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रिषभ पंत, शिखर धवन, कुलदीप यादव आणि रोहित शर्मा हे लहान मुलं होऊन आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करत लहान मुलांसारखी मस्ती करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुलदीप यादव छोटी सायकल चालवताना तर इतर खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत. असे करून हे क्रिकेटपटू आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आहेत. धवनने या व्हिडिओला ‘तुम्ही कितीही मोठे व्हा, पण बालपण हरवू देऊ नये. आयुष्यात काम देखील करायला हवे, पण मस्ती देखील करायला हवी’, अशी कॅप्शन पण दिली आहे.
येत्या १२ मार्च पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण पाच सामने खेळले जाणार आहेत. हे पाचही सामने अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वरच खेळवले जातील. सप्टेंबर महिन्यात भारतातच होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप पूर्वी सरावाची भारतीय संघासाठी ही शेवटची संधी असेल.
महत्वाच्या बातम्या:
देशापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देणार इंग्लिश क्रिकेटपटू?, मुख्य प्रशिक्षकाचे आले मोठे विधान
महिला दिन विशेष : खेळाची मैदाने गाजवणाऱ्या रणरागिणी