भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. अगदी काही महिन्यांपूर्वी भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करत असलेला शिखर तीनही प्रकारच्या क्रिकेट संघाचा भाग नाही. आता आगामी काळात तो आयपीएलच्या सोळाव्या हंगामात खेळताना दिसेल. यावेळी त्याला पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याला भारतीय संघातील पुनरागमनाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे मन जिंकले.
एका आघाडीच्या क्रीडा वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत शिखरने दिलखुलास उत्तरे दिली. त्याला प्रश्न विचारण्यात आला की, जर आता तू निवडकर्ता असता तर तू कोणाची निवड केली असती? शिखर धवन की शुबमन गिल?
त्यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“नक्कीच शुबमन गिल. कारण तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय आणि त्याचा फॉर्मही आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा मी त्यालाच संधी देणे योग्य समजतो.”
याच बाबतीत पुढे बोलताना तो म्हणाला,
“अलीकडच्या काळात प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी मला पुरेशी संधी दिली. दुर्दैवाने माझा फॉर्म खराब झाला. त्यानंतर संधी मिळालेल्या शुबमनने ती संधी साधून मोठ्या खेळ्या केल्या. मला तो जसा खेळतोय ते पाहून नक्कीच आनंद होतो.”
भारतीय संघाला चालू वर्षी वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करण्याचा मनोदय देखील त्याने बोलून दाखवला. सध्या भारतीय संघात सलामीला कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी जागा पक्की केली आहे. तरी तिसरा सलामीवीर म्हणून अद्याप जागा रिक्त असल्याचे दिसून येते.
(Shikhar Dhawan Said I Choose Shubman Gill Over Me In Indian Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि सीएसके सोडण्याच्या तयारीत असलेला जडेजा नरमला, धोनीची शिष्टाई आली कामी
नंबर वन यारी! रिषभला भेटण्यासाठी पोहोचले भारतीय दिग्गज, म्हणाले, ‘फिनिक्स पक्षासारखी भरारी घे’