मुंबई । सलामीचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन मैदानावर तडाखेबाज खेळी करत क्रिकेट फॅन्सची जशी मने नेहमी जिंकतो, तशीच मने जिंकणारी कामे मैदानाच्या बाहेर करत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान धवनने त्याचा मुलगा आणि पत्नी आयशासोबत घराबाहेर पडून उपाशी गायींना चारा खाऊ घालत आहे. याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ” जी लोक खरी संकटात आहेत अशा गरजवंत लोकांना मदत करणे गरजेचं आहे. एक वडील या नात्याने आपल्या मुलाला जीवनातील योग्य गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. कठीण परिस्थितीत मुक्या जनावरांना चारा देणे गरजेचे आहे. मी माझ्या मुलाला हेच शिकवण देत आहे. यावर मला खूप गर्व आहे. मी प्रत्येकाला विनंती करतो की, त्यांनी आपल्या जवळचा काही हिस्सा गरजू लोकांसाठी द्यावा.”
https://www.instagram.com/shikhardofficial/?utm_source=ig_embed
काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननस मध्ये स्फोटके भरून खायला दिल्यानंतर तिचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेनंतर धवन देखील ट्विट करत आपला राग व्यक्त केला.
धवनने ट्वीट करत लिहिले की, “निर्दोष प्राण्यांविषयी घडलेली ही क्रूर घटना ऐकून हृदय हेलावले. घटना ऐकून मी खूपच निराश झालो. दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.”