भारतीय क्रिकेट संघाचा धाकड सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला असल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आयेशाने तिच्या इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. शिखर आणि आयेशा यांचे २०१२ साली लग्न झाले होते. तसेच त्यांना जोरावर नावाचा मुलगा देखील आहे. मात्र लग्नाच्या ९ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. विवाहित, पदरात २ मुली अन् वयात सुमारे १० वर्षांचे अंतर, अशी पार्श्वभूमी असूनही धवन पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला होता.
आपल्या ‘गब्बर’ या टोपन नावाप्रमाणेच धवनचा खेळण्याचा अंदाजही आक्रमक आहे. अशा या भारतीय क्रिकेटपटूची प्रेमकहाणीही अनोखीच राहिली आहे.
शिखरने स्वत:च त्याच्या पत्नीबरोबर त्याची पहिली ओळख कशी झाली? याचा खुलासा ‘व्हॉट द डक’ या कार्यक्रमात केला होता. भारताच्या या रांगड्या खेळाडूची बायकोशी ओळख ही फेसबुकच्या माध्यमातून झाली असल्याचे त्याने सांगितले होते.
बंगाली सुंदरी असणाऱ्या आयेशा मुखर्जीला शिखरने प्रथम फेसबुक या सोशल मेडिया वेबसाईटवर पाहिले होते. भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याला हे नाव सुचवल्याचं शिखर म्हणतो. जेव्हा तिला पहिल्यांदा फेसबुकवर पाहिलं तेव्हाच ती शिखरला आवडल्याचं तो सांगतो.
त्यानंतर त्याने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही काळाने तिने ती स्वीकारली आणि या सुंदर जोडप्यात फेसबुकच्या माध्यमातून संवाद सुरु झाला.
https://www.instagram.com/p/B4O9LAfndD_/
आयेशाचे वडील हे भारतीय तर आई इंग्लिश आहे. तिचा जन्म जरी भारतात झाला असला तरी लगेचच तिच कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झालं. तिने नंतर किकबॉक्सिंगच प्रशिक्षण घेतलं. ती चांगलं बंगाली आणि इंग्लिश बोलते.
शिखर आणि आयेशाने त्यांच्या जवळपास ४ वर्षांच्या प्रेमाचे रुपांतर ३० ऑक्टोबर २०१२ मध्ये पती-पत्नीच्या नात्यात केले होते. त्यांच्या विवाहसोहळ्यास कुटुंबियांशिवाय काही भारतीय क्रिकेटपटूही सामील झाले होते.
https://www.instagram.com/p/CDYXw14jX9A/?utm_source=ig_web_button_share_sheet
विशेष म्हणजे आयेशा शिखर पेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. तसेच आयेशाचे शिखर आधी एका ऑस्ट्रेलियन उद्योगपतीशी लग्न झालं होतं. परंतु, काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला. तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून दोन मुली असून एकिच नाव रिहा तर दुसरीच आलिया आहे. लग्नानंतर या दोन्ही मुलींना शिखर आपल्याच मुली मानत असे. तसेच आयेशा आणि शिखरला २०१४ मध्ये झोरावर नावाचा मुलगा झाला.
https://www.instagram.com/p/BtJKkzmhSt7/
सध्या शिखर भारतात राहतो तर आयेशा ऑस्ट्रेलियामध्ये रिहा, आलिया आणि झोरावरसह राहते. शिखर अधूनमधून ऑस्ट्रेलियात जात असायचा. तर कधी आयेशा त्याला भेटण्यासाठी भारतात येत असे.
महत्त्वाच्या बातम्या-
नातं तुटलं! शिखर धवनने घेतला पत्नी आयेशापासून घटस्फोट; सोशल मीडियावरून दिली माहिती
‘जार्वो’ पुन्हा चर्चेत, भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे मानले आभार; पण काय आहे कारण?
आयपीएलमधून बाहेर, मग टी२० विश्वचषकात खेळणार का अष्टपैलू स्टोक्स? प्रशिक्षकांनी दिली माहिती