संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ सध्या विजयरथावर स्वार आहे. त्यांनी आतापर्यंत ११ सामने खेळले असून ७ विजय मिळवले आहेत. राजस्थानचा संघ सध्या १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान राजस्थान संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा धाकड फलंदाज शिमरॉन हेटमायर हंगामाच्या अर्ध्यातून घरी, गयानाला रवाना झाला आहे. राजस्थान संघाने याबद्दल माहिती दिली आहे.
राजस्थान संघासाठी (Rajasthan Royals) मॅच विनिंग खेळी खेळणारा हेटमायर (Shimron Hetmyer) त्याच्या मुलाच्या जन्मासाठी घरी परतला (First Child Birth) आहे. राजस्थान संघाने ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हेटमायर त्याच्या बाळाच्या जन्मानंतर मुंबईला परतणार आहे आणि आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध राहणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थान संघाने ट्वीट करत म्हटले आहे की, ‘आम्ही हेटमायरची शक्य तितकी मदत करत आहोत. आमच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आणि त्याची पत्नी निर्वाणीसोबत आहेत. आम्ही अपेक्षा करतो की, हेटमायर पुन्हा मुंबईला परतेल आणि आमच्यासाठी आयपीएल २०२२च्या (IPL 2022) उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध राहिल.’
Shimron Hetmyer has travelled back to Guyana early morning today for the imminent birth of his first child, but he’ll be back soon. 💗
Read more: https://t.co/cTUb3vFiNl#RoyalsFamily | @SHetmyer pic.twitter.com/u52aO9Dcct
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2022
राजस्थान संघाचे चालू हंगामातील प्रदर्शन
राजस्थान संघ जणू या हंगामात दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी जणू चंग बांधून मैदानात उतरला आहे. त्यांनी आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यापैकी ७ सामने जिंकले आहेत, तर ४ सामने गमावले आहेत. परिणामी त्यांच्या खात्यात १४ गुणांची नोंद आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यानंतर राजस्थान संघ प्लेऑफचा प्रबळ दावेदार आहे. अजून त्यांचे ३ सामने खेळायचे बाकी आहेत.
शिमरॉन हेटमायर राजस्थानसाठी ठरलाय मॅच विनर
हेटमायरने या हंगामात राजस्थान संघाचे ११ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्त्व करताना ७२.७५च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघाले आहे. त्याने बऱ्याच सामन्यांमध्ये राजस्थान संघाला अंतिम षटकात सामना जिंकून देण्याचे काम केले आहे. यामध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या हंगामातील ५२व्या सामन्याचाही समावेश आहे. या सामन्यात पंजाबच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हेटमायरने १६ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी केली होती, ज्याच्या जोरावर राजस्थानने २ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कोलकाताचं चुकलं कुठं? लखनऊविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं कारण
केएल राहुल ‘डायमंड डक’चा शिकार, आयपीएल इतिहासातील नकोसा विक्रम केला नावे
सात सामन्यांनंतर पुनरागमन करताना जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय