---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: शिवम दुबेचे शानदार अर्धशतक पूर्ण!

---Advertisement---

तिरुअनंतपुरम। आज(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने अर्धशतक पूर्ण केले आहे.

या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती मिळाली. त्यानेही या संधीचा पुरेपुर फायदा घेत 27 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले आहे.

मात्र त्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच विकेट गमावली. त्याला 30 चेंडूत 54 धावांवर असताना हेडन वॉल्शने बाद केले. शिवमचा झेल शिमरॉन हेटमायरने घेतला.

या सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांची विकेट लवकर गमावली होती. रोहितला 15 धावांवर जेसन होल्डरने त्रिफळाचीत केले. तर राहुलला 11 धावांवर खॅरी पियरने बाद केले. पण शिवमने केलेल्या तुफानी अर्धशतकामुळे भारताने 10 षटकात 90 धावांचा टप्पा पार केला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---