भारत-बांगलादेश संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 2-0 ने वर्चस्व गाजवले. भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या टी20 मालिकेला (6 ऑक्टोबर) पासून सुरूवात होणार आहे. पण या टी20 मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका लागला आहे. कारण भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू या मालिकेतून बाहेर पडला आहे.
वास्तविक, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) बांगलादेशविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे दुबे या टी20 मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची घोषणाही करण्यात आली आहे.
🚨 NEWS 🚨
Shivam Dube ruled out of #INDvBAN T20I series.
The Senior Selection Committee has named Tilak Varma as Shivam’s replacement.
Details 🔽 #TeamIndia | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 5, 2024
भारतीय संघाच्या या अष्टपैलू खेळाडूने अलीकडच्या काळात संघासाठी अनेक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय नियामक मंडळाने (BCCI) आपल्या अधिकृत वेबसाईटवरून शिवम दुबे (Shivam Dube) टी20 मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सांगितले की, शिवम दुबेच्या पाठीला दुखापत झाली आहे.
शिवम दुबेच्या जागी भारतीय संघात तिलक वर्माचा (Tilak Verma) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आता दुबेच्या जागी तिलक वर्मा (Tilak Verma) बांगलादेशविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत खेळताना दिसणार आहे. तिलक रविवारी ग्वाल्हेरमध्ये संघात सामील होईल. दुबे संघात नसणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! वनडेमध्ये ‘या’ एकाच सामन्यात झाले होते सर्वाधिक RUN-OUT
भारत-न्यूझीलंड सामन्यात अंपायरच्या निर्णयामुळे राडा!
भारतासाठी सर्वाधिक वनडे सामने जिंकणारे टॉप-5 कर्णधार