---Advertisement---

फक्त या खेळाडूने साथ दिली तर टीम इंडियासाठी विजेतेपदांचा रतीब लावू

On: गुरूवार, मार्च 12, 2020 8:44 PM
---Advertisement---

आज (12 मार्च) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. या मालिकेतून भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या जवळजवळ 6 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता.

पंड्याने सप्टेंबर 2019पासून पाठीच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. त्याच्या अनुपस्थितीत नोव्हेंबर 2019मध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी20 सामन्यातून अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होेते. मात्र, या वनडे मालिकेतून पंड्या पुनरागमन करणार असल्यामुळे दुबेला स्थान मिळाले नाही.

यावेळी दुबेने भविष्यातील सामन्याबद्दल भाष्य केले आहे. “जर मला पंड्याची सोबत मिळाली तर आम्ही दोघे मिळून भारताला खूप सामने जिंकवून देऊ शकतो,” असे तो म्हणाला आहे.

“भारतीय संघाला आपली जिंकण्याची शक्यता वाढवायची असल्यास संघातील पहिल्या अकरामध्ये 2 अष्टपैलू क्रिकेटपटूंचा समावेश करावा. मला वाटते की, संघात पहिल्या अकरात 2 अष्टपैलू क्रिकेटपटू असतील तर अधिक पर्यायही उपलब्ध होतील. जर मी आणि हार्दिक सोबत असू तर आम्ही नक्कीच संघाला विजय मिळवून देऊ शकतो,” असेही दुबे यावेळी म्हणाला. 

दुबेने 12 टी20 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय वनडेत पदार्पणाच्या सामन्यात त्याने 8 षटकात 68 धावा केल्या होत्या. यावर दुबे म्हणाला, “मला वाटते की मी एक अष्टपैलू फलंदाज आहे. देशांतर्गत सामन्यात मी जे षटकार मारले होते त्यांच्यावर मला चांगली मेहनत घेण्याची गरज आहे. माझ्याजवळ नैसर्गिक ताकद आहे. यामुळे मी सतत मोठे फटके मारण्याचा सराव करत असतो.”

याचबरोबर दुबेने आयपीएलमध्ये आरबीसी संघाकडून चांगली कामगिरी करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. “मी माझ्या फिटनेस आणि इतर गोष्टींवर काम करत आहे. आयपीएल एक मोठी स्पर्धा आहे. मला वाटते की आरसीबी यावेळी विजेतेपद मिळवेल आणि एक अष्टपैलू क्रिकेटपटू असल्याने मी चांगले प्रदर्शन कराण्याची अपेक्षा आहे,” असे दुबे पुढे बोलताना म्हणाला.

ट्रेडिंग बातम्या-

कोरोनाची वक्रदृष्टी आता प्रेक्षकांवर, टीम कोहलीला नाही देता येणार पाठींबा

आधीच कोरोना त्यात पावसाचा कहर! टीम इंडियाची पहिली वनडे रद्द

वैतागलेल्या गोलंदाजाने विकेट मिळाली नाही म्हणून थेट तोडला स्टंप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---