इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. आयपीएलचे साखळी फेरी सामने संपले असून आता प्लेऑफ सामने सुरू होतील. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम याच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. जर आझम आयपीएलमध्ये खेळत असता तर कोणत्या संघाने त्याच्यावर बोली लावली असती, त्या संघाचे नाव अख्तरने सांगितले आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आयपीएलच्या (Indian Premiere League) पहिल्या हंगामात अर्थात २००८ मध्ये सहभाग नोंदवला होता. परंतु त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर आयपीएलमधून कायमची बंदी घालण्यात आली आहे. मात्र जर इतर देशांतील खेळाडूंप्रमाणे पाकिस्तानचे खेळाडूही आयपीएलमध्ये खेळत असते, तर आझमवर (Babar Azam) आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने विश्वास दाखवला असता, असे अख्तरला (Shoaib Akhtar) वाटते.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला मागील २ हंगामांपासून अपेक्षित प्रदर्शन करता येत नाहीय. यावेळी मुंबई संघ सर्वात आधी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तसेच ते गुणतालिकेत सर्वात तळाशीही राहिले आहेत. मागील हंगामातही मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नव्हते.
अशात जिओ न्यूजशी बोलताना अख्तर म्हणाला की, “पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आझम आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो. मुंबईचा संघ त्याला सर्वात महागडा खेळाडू म्हणून विकत घेऊ शकते. जर आझम (Babar Azam Mumbai Indians)आयपीएलमध्ये खेळत असता, तर तो या टी२० लीगचा अव्वल स्टार क्रिकेटपटू म्हणून ओखळला गेला असता.”
दरम्यान आझमला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. त्याने आतापर्यंत टी२० स्वरूपात ७४ सामने खेळताना ४५.५३च्या सरासरीने २६८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतकही निघाले आहे. त्याची टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी १२२ धावा इतकी आहे. तसेच त्याने टी२० क्रिकेटमध्ये २६ अर्धशतकेही केली आहेत.
आझम या स्वरूपात पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याच्यानंतर मोहम्मद हाफिज ११९ सामन्यात २५१४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शोएब मलिक १२३ सामन्यांत २४२३ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
GTvsRR। बटलर ते मिलर, ‘या’ ५ खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा, गाजवू शकतात पहिला क्वालिफायर सामना
‘भारतीय स्पीडगन’ उमरानचे टीम इंडियात निवड झाल्याबद्दल इरफान पठाणबरोबर खास सेलिब्रेशन, Video व्हायरल
मॅच सुरू असतानाच मेंडिसच्या छातीत असह्य वेदना, दाखल करावं लागलं थेट हॉस्पिटलमध्ये