---Advertisement---

ओवरस्मार्टपणा शोएब अख्तरला नडला!! शो मध्येच सोडून गेल्याने चॅनेलने पाठवली ‘इतक्या’ कोटींची मानहानीची नोटीस

On: सोमवार, नोव्हेंबर 8, 2021 11:35 PM
---Advertisement---

शोएब अख्तर आणि वाद यांचं नातं काही जुनं नाहीये. आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शोएब अख्तर आणि दिग्गज खेळाडूंनी पीटीव्ही स्पोर्ट्सच्या चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे निवेदक नौमान नीयाज होते. या कार्यक्रमाच्या वेळी शोएब अख्तर आणि नौमान नीयाज यांच्यात वाद झाला होता. ज्यामुळे नौमान नीयाज यांनी शोएब अख्तरला शो मधून निघून जाण्यास सांगितले होते. त्यावेळी शोएब अख्तर शो सोडून निघून गेला होता. ज्याचा फटका त्याला आता बसू शकतो.

पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन (पीटीव्हीने) शोएब अख्तरला १०० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यात असे म्हटले आहे की, शोएब अख्तरने गेल्या महिन्यात पीटीव्ही स्पोर्ट्समधून ऑन-एअर राजीनामा दिला होता, ज्यामुळे दोघांमधील कराराचे उल्लंघन झाले आहे. पण त्यामुळे पीटीव्हीचेही मोठे नुकसान झाले आहे. पीटीव्हीची नोटीस आल्यानंतर शोएब अख्तरने देखील कायदेशीर रित्या लढण्याची घोषणा केली आहे.

पीटीव्हीने नोटीस बजावल्यानंतर शोएब अख्तरने ट्विट करत लिहिले की, “मी पीटीव्हीसाठी काम करत असताना माझ्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यात अत्यंत अपयशी ठरल्यानंतर, त्यांनी आता मला पुनर्प्राप्तीची नोटीस पाठवली आहे. मला ही लढता येतं. मी हार मानणार नाही. मी कायदेशीर लढाई लढणार आहे. कायद्यानुसार आम्ही हा लढा सुरू ठेवू.”

एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, पीटीव्हीने शोएबला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “कराराच्या क्लॉज-२२ नुसार, दोन्ही पक्षांना ३ महिन्यांची लेखी नोटीस देऊन किंवा त्याऐवजी पैसे देऊन त्यांचा करार संपुष्टात आणण्याचा अधिकार असेल. तर शोएब अख्तरने २६ ऑक्टोबर रोजी ऑन एअर राजीनामा दिला होता. यामुळे पीटीव्हीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

महाराष्ट्राचा विजयरथ सुसाट! केदारचे दमदार अर्धशतक; अझीम काझीची शानदार हॅट्रिक

विक्रमवीर राहुल! तुफानी अर्धशतकासह मोडून काढली विराटची तीन विश्वचषकांतील मक्तेदारी

टी२० कर्णधार म्हणून अखेरचा सामना खेळताना विराटचा मोठा पराक्रम, धोनीनंतर ‘असा’ विक्रम करणारा दुसराच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---