---Advertisement---

‘भारतीय खेळाडूंना झोपेच्या गोळ्या द्या’; मोठ्या सामन्यापूर्वी बरळला पाकिस्तानचा शोएब अख्तर

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 3:52 PM
---Advertisement---

रविवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात, त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर, पाकिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध झालेल्या एकही सामन्यात विजय मिळवता आला नाहीये. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघ भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येईल. तत्पूर्वी माजी पाकिस्तान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी मजेशीर सल्ला दिला आहे.

पाकिस्तान संघाविरुद्ध टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ८ पैकी ७ सामन्यात विजय मिळवला आहे. यापैकी ५ सामने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आहेत. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघ जोरदार कामगिरी करून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

दरम्यान शोएब अख्तरने मजेशीर सल्ला देत म्हटले की, “सर्वप्रथम भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या. विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून थांबवा आणि तिसरा सल्ला म्हणजे एमएस धोनी स्वतः फलंदाजी करण्यासाठी येऊ नये. मी तुम्हाला सांगतो की,तो अजूनही जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “पाकिस्तान संघाला चांगली सुरुवात करावी लागेल. तसेच त्यांना कमीत कमी डॉट चेंडू खेळावे लागणार आहेत. सुरुवातीच्या षटकात धावा करून शेवटी ते स्ट्राइक रेट वाढवू शकतात. त्यानंतर गोष्ट येते गोलंदाजीची. जर तुम्ही मोठी धावसंख्या उभारली तर गोलंदाजी करताना गडी बाद करण्याचा प्रयत्न करा.”

अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ईलेव्हन 
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या,रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार/शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तान – मोहम्मद रिजवान (यष्टिरक्षक), बाबर आजम ( कर्णधार), फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, असिफ अली/ हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहिन आफ्रिदी, हरीस रऊफ

महत्त्वाच्या बातम्या-

रनसंग्रामाआधी मेंटॉर धोनी लागला कामाला; कर्णधारासह संघाला दिले धडे; पाहा व्हिडिओ

सरावात दिसला ‘किंग कोहली’चा धमाका; व्हिडिओ पाहून उडेल पाकिस्तानचा थरकाप

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---