पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि माजी कर्णधार शाहीद अफ्रिदी यांनी पाकिस्तान संघासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र प्रतिनिधित्व केले आहे. हे दोघे एकमेकांसोबत असलेल्या चांगल्या मैत्रीसाठी देखील ओळखले जातात. अशातच शोएब अख्तरच्या शाहीद आफ्रिदीविषयी असलेल्या चार तक्रारी समोर आल्या आहेत.
यापूर्वी या दोघांना एकमेकांची मस्करी आणि कौतुक करताना पाहिले गेले आहे. आता शोएब अख्तरने मंगळवारी (१६ नोव्हेंबर) शाहीद आफ्रिदीसोबतचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात अख्तरने आफ्रिदीविषयी त्याच्या मनात असलेल्या तक्रारींचा खुलासा केला आहे.
शोएब अख्तरने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत त्याने खुसाला केला आहे की त्याला पाकिस्तानच्या माजी कर्णधाराविषयी काही तक्रारी होत्या. त्याने या व्हिडिओत चार मुद्दे मांडले आहेत. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “बूम बूम शाहीद आफ्रिदीविषयी जे बोलत आहेत, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का ?”
अख्तर व्हिडिओत म्हणत आहे की, “शाहीद आफ्रिदीसोबत माझी एकच समस्या आहे की, तो दिसायला चांगला आहे आणि पुन्हा माझ्याकडे अजून एक समस्या ही आहे की, तो चेंडूला माझ्यापेक्षा जास्त हिट करतो. खरं तर, समस्या ही आहे की, तो माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.”
“माझ्याकडे त्याच्याविषयी अजून एक सर्वात मोठी समस्या ही आहे की, त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त केस आहेत. मी दुसऱ्या दिवशी विमानात त्याच्या भावासोबत हेच बोललो की, त्याचे केस माझ्यापेक्षा जास्त आहेत आणि तो माझ्यापेक्षा अधिक चांगला दिसणारा आहे.” व्हिडिओच्या शेवटी आफ्रिदी कॅमेऱ्याच्या एका दिशेला इशारा करतो आणि अख्तरला म्हणतो “लोक तुझी वाट पाहत आहेत.”
https://twitter.com/shoaib100mph/status/1460570177213550592
चाहत्यांनी नेहमीच या दोघांना एकत्र पाहायला आवडते आणि याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तत्पूर्वी, टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हे दोघे सामना पाहण्यासाठी एकत्र होते. अख्तरने अंतिम सामन्यातदरम्यानचा एक फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रोमहर्षक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने ‘या’ २ खेळाडूंचे गायले गुणगान
जेव्हा एमएस धोनीने साक्षीला सोडून आपल्या ‘हनी’ सोबत केली टी-डेट, पाहा फोटो





