---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा वचपा काढण्याची टीम इंडियाला संधी; २०२२ मध्ये दोन वेळा कट्टर प्रतिस्पर्धी येऊ शकतात आमने-सामने

On: गुरूवार, नोव्हेंबर 18, 2021 3:18 PM
Virat-Kohli-Babar-Azam
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हे दोन्ही संघ जेव्हा आमने-सामने येतात, त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. आता येणाऱ्या वर्षात भारतीय संघाला या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे. २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ २ वेळेस आमने सामने येऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसीने ) बुधवारी (१७ नोव्हेंबर) १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेची घोषणा केली आहे. ज्यामध्ये एकूण १६ संघ सहभाग घेणार आहेत. तर एकूण ४८ सामने खेळले जाणार आहेत. भारतीय संघ ग्रूप बीमध्ये असून, या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, युगांडा हे संघ आहेत, तर पाकिस्तान संघ ग्रूप सीमध्ये आहे. ज्यामध्ये अफगानिस्तान, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी संघ आहेत. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे.

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ बाद फेरीमध्ये आमने-सामने येऊ शकतात. तसेच २०२२ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा देखील होणार आहे. या स्पर्धेत देखील भारतीय संघाचा सामना पाकिस्तान संघासोबत होऊ शकतो. या शिवाय आशिया चषक देखील येत्या वर्षात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतही भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो.

१९ वर्षांखालील भारतीय संघाने मिळवले आहे ४ वेळेस जेतेपद
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेला १९८८ मध्ये प्रारंभ झाला होता. भारतीय संघाने आतापर्यंत ४ वेळेस या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. विराट कोहलीने देखील कर्णधार म्हणून जेतेपद मिळवले आहे. स्पर्धेचे १३ हंगाम झाले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने ३ वेळेस, पाकिस्तान संघाने २ वेळेस तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघाला प्रत्येकी १ वेळेस जेतेपद मिळवण्यात यश आले आहे. २०२० मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते.

या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला स्टार खेळाडू मिळाले आहेत. ज्यामध्ये विराट कोहली, बाबर आजम, केन विलियमसन, शिमरॉन हेटमायर यांचा समावेश आहे. भारतीय संघाला २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वाखाली, २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली, २०१२ मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वाखाली आणि २०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने जेतेपद जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा एमएस धोनीने साक्षीला सोडून आपल्या ‘हनी’ सोबत केली टी-डेट, पाहा फोटो

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी२० सामन्यातील १० महत्त्वपूर्ण गोष्टी

विजयाचे शिल्पकार! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ‘या’ ५ भारतीय खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---