---Advertisement---

सचिन, गांगुली, सेहवाग नाही तर ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना शोएब अख्तरला यायचे टेंशन

---Advertisement---

मुंबई । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या वेगवान चेंडूंचा सामना अनेक फलंदाजांनी केला आहे, पण एक फलंदाज होता ज्याला गोलंदाजी करणे शोएब अख्तरसाठी सर्वात कठीण काम होते. तो सचिन तेंडुलकर नव्हता. तो सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण नव्हते. वीरेंद्र सेहवाग आणि एमएस धोनीलाही गोलंदाजी करणे अख्तरला कठीण नव्हते. तर तो फलंदाज होता – राहुल द्रविड. अख्तर म्हणाला की, ‘राहुल द्रविड माझी गोलंदाजी सहज खेळून काढायचा.’

आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनल ‘आकाशवाणी’वर शोएब अख्तर म्हणाला, “जर कोणी राहुल द्रविडसारखे खेळत असेल तर आम्ही त्याला लेंथ चेंडू फेकायचो. स्टंपच्या जवळपास आमचे लक्ष्य फलंदाज आणि पायामधील अंतर शोधणे होते.”

शाहिद आफ्रिदीबरोबर अख्तरने भारतीय क्रिकेट संघाची ‘द वॉल’म्हणजेच द्रविडला बाद करण्याची योजना आखली तेव्हाची त्याने एक घटना सांगितली. अख्तरने सामन्याबाबत काही सांगितले नसले तरी तो 1999 च्या पेप्सी कपच्या अंतिम सामन्याचा संदर्भ घेत असल्याचे दिसून आले.

भारत आणि पाकिस्तानशिवाय श्रीलंका हा या स्पर्धेत तिसरा संघ होता. अजय जडेजाच्या नेतृत्वात झालेल्या या सामन्याच 292 धावांचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीची विकेट गमावली. शोएब अख्तर म्हणाला, “बेंगळुरू येथे हा अंतिम सामना होता. मी सदागोपन रमेश यांना बाद केले होते. भारताने 3-4 विकेट लवकर गमावले. सचिन तेंडुलकर सामन्यात खेळत नव्हता. शाहिद आणि मला वाटले की राहुल सेट होण्यास वेळ घेईल. तो शुक्रवारचा दिवस होता.”

तो पुढे म्हणाला,”शाहिद आफ्रिदी म्हणाला की त्याची विकेट लवकर घ्यावी, अन्यथा तो बराच काळ क्रिजवर राहील. मी चेंडू थेट त्यांच्या पॅडवर मारला आणि पंचांना अपील केले. मी अगदी म्हटलं की ती शुक्रवारीची रात्र होती. पंचांनी आमच्या बाजूने निर्णय दिला नाही. तथापि, शेवटी आम्ही जिंकलो. राहुल द्रविड एक शांत फलंदाज होता. तो माझी गोलंदाजी सहज खेळायचा. त्याला गोलंदाजी करणे हे माझ्यासाठी सर्वात कठीण काम होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

-या दिग्गज खेळाडूची १९ वर्षीय मुलगी आहे खूपच सुंदर; सोशल मीडियावर आहेत भरपूर फॉलोवर्स

-आयसीसी क्रमवारीत ख्रिस वोक्सची मोठी झेप; आर अश्विनला धोका

-१३ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा

ट्रेंडिंग लेख-

-या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश

-आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू

-अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---