भारतीय संघाला आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहा दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकात खेळणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. बुमराहा मागच्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत त्याने संघात पुनरागमन केले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी माघार देखील घेतली. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बुमराहच्या दुखापतीविषयी बोलताना दिसतो.
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला, “त्याची गोलंदाजी फ्रंटल एक्शनवर अवलंबून आहे. अशा प्रकारच्या एक्शनचे गोलंदाज त्यांची पाठ आणि खांद्याच्या जोरावर गती मिळवतात. फ्रँटल आर्म एक्शनवाल्या गोलंदाजाच्याच पाठीला एकदा दुखापत झाली, तर त्याने कितीही प्रयत्न करूद्या, ही दुखापत त्याची पाठ सोडत नाही.”
“मी इयान बिशन आणि शेन बॉन्ड यांच्या पाठीला दुखापत होता पाहिली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला आता अशाच पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. एक सामना खेळला, एक सुट्टी घ्यायची आणि रिहॅबसाठी जायचं. त्याला वर्कलोड मॅनेज करण्याची गरज आहे. जर तुम्ही त्याला प्रत्येक सामन्यात खेळवले, तर त्याची फिटनेस पूर्णपणे ढासळेल. त्याने पाच पैकी तीन सामने खेळवा आणि बाहेर बसला. त्याला संघात टिकून राहायचे असेल तर, या एका गोष्टीचे मॅनेजमेंट करावे लागेल,” असेही अख्तर पुढे बोलताना म्हणाला होता.
https://twitter.com/Usama7/status/1575441403651530752?s=20&t=9TNqV9JuNFPajksuEgC_Dw
दरम्यान, बुमराहा दुखापतीच्या कारणास्तव आशिया चषक 2022 मध्येही खेळू शकला नव्हता. आशिया चषकात बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघ चांगले प्रदर्शन करू शकला नव्हता. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला बुमराहच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी दिली गेली आहे. आगामी टी-20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) त्याची गाजा गोण घेणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये. मोहम्मद शमी, दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज यांनी नावे त्याची जागा घेण्यासाठी चर्चेत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: जसप्रीत बुमराहची ‘रिप्लेसमेंट’ मोहम्मद सिराजची टी20 आकडेवारी थक्क करणारी
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री






