---Advertisement---

देवानंतर सचिनमुळेच झालो मी स्टार; रावळपिंडी एक्सप्रेसची कबुली

---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा त्याच्या विधानाने नेहमीच चर्चेत असतो. त्याने मैदानावर अनेक फलंदाजांना जलद गतीने गोलंदाजी करत चांगलाच त्रास दिला आहे. त्यातच त्याची आणि भारतीय संघाचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची जुगलबंदी पाहण्यात चाहत्यांना नेहमीच मजा यायची. अशातच त्याने सचिनशी संबंधित एक २३ वर्ष जुना किस्सा सांगितला आहे.

पाकिस्तानचा संघ १९९९ला भारताच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी घडलेल्या एका सामन्यात शोएबने सक्लेन मुश्ताकला विचारले, “क्रिकेटचा देव कोण आहे? त्याने सचिनचे नाव घेतले. यानंतर मी त्याला म्हणालो जर मी त्याला बाद केले तर काय होईल. तेव्हा तो म्हणाला मी त्याला दोन वेळा बाद केले आहे. यावरून आमच्यात थोडा वाद झाला.” सचिनला मुश्ताकने चेन्नईच्या कसोटी सामन्यात दोनदा बाद केले आहे.

कोलकाता सामन्यातील क्षण आठवत शोएब म्हणाला, “सचिन स्ट्राईकवर येण्याची तयारी करत होता. तेव्हा वसिम अक्रमने मला रिव्हर्स स्विंग टाकायला सांगितले होते. यावेळी मी त्याला बाद करण्याबाबत चिंतेत होतो. पण जेव्हा मी चेंडू टाकायला सुरूवात केली तेव्हा माझ्या धावण्यावर मी लक्ष केंद्रित केले होते.”

“सचिनने बॅट उचलली तेव्हा तो बाद होणार हे कळाले आणि झालेही तसेच. कारण चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. सचिन बाद झाल्यावर संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. तेथे फक्त आमचाच आवाज येत होता. याचवेळी मला कळून चुकले अल्लाह नंतर मला कोणी स्टार बनवले तो सचिन तेंडुलकरच आहे,” असे शोएबने पुढे म्हटले आहे. आशियाई टेस्ट चॅम्पियनशीपच्या कोलकाता येथील सामन्यात शोएबने सचिनला पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले होते. हा सामना पाकिस्तानने ४६ धावांनी जिंकला होता.

इडन गार्डनवर झालेला हा सामना सचिनच्या शून्यावर बाद होण्याने चांगलाच चर्चेत आला होता. या चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळत होता.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दीडशेहून अधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजावरील बॅन हटला, ‘या’ कारणामुळे आणली होती बंदी

सचिनचा ‘तो’ महाविक्रम मोडूनच थांबली मिताली, आता तिचा विक्रम मोडणे जवळपास अशक्यच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---