ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाईल. या विश्वचषकात सर्वाधिक चर्चा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची होत आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी लोक आत्तापासून आतुर आहेत. या सामन्यात क्रेझ इतकी आहे की, लोकांनी अगदी हॉस्पिटलमधील बेड देखील त्यादिवशी बुक करून ठेवले आहेत. अशात आता या सामन्याविषयी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठे विधान केले आहे.
दोन शेजारी देशातील हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यावर सर्वांची नजर असते. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकातील सामन्यात विराटने एकहाती भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्याआधी देखील 2015 वनडे विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात विराटने शतक झळकावलेले. तर, 2012, 2014, 2016 व 2021 टी20 विश्वचषक सामन्यांमध्ये विराटच भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिलेला. याच पार्श्वभूमीवर बोलताना अख्तर म्हणाला,
“विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना म्हणजेच आपल्याला संकेत मिळत आहे की कोहली पुन्हा एकदा किंग होईल. प्रेक्षकांकडून त्याला मिळत असलेला पाठिंबा, प्रसारमाध्यमांनी तयार केलेली हवा, मैदानात एक लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक आणि 130 कोटी भारतीय व 30 कोटी पाकिस्तानी लोक हा सामना पाहणार असल्याने, विराट पुन्हा एकदा आपली सर्वोत्तम कामगिरी करेल.”
भारतीय संघ या विश्वचषकात आपल्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध करेल. भारतीय संघाला विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात असून, 2011 नंतर भारतीय संघ हा विश्वचषक उंचावण्याचा प्रयत्न करेल.
(Shoaib Akhtar Said Virat Kohli Will Become King Against Pakistan In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
गंभीर सोडणार सुपरजायंट्सची साथ? ‘या’ संघाकडून आली ऑफर
मिनी ऑरेंज आयटीएफ मिश्र रिले राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक