इंग्लंडचा दिग्गज जोफ्रा आर्चर सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. त्याच्या दुखापतीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आर्चरला आता नवीन दुखापत उद्भवली आहे. आता त्याच्या पाठीच्या खालच्या भागात ताण आला आहे. याच कारणास्तव तो इंग्लंड क्रिकेट संघाच्या आगामी मालिकेतून बाहेर झाला आहे.
जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याची दुखापत इंग्लंड क्रिकेट संघासाठी मोठा झटका मानली जात आहे. पुढच्या महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आर्चरच्या या नवीन दुखापतीविषयी माहिती दिली आहे. बोर्डाने आर्चर आगामी हंगामात सहभाग घेणार नाही, याविषयी पुष्टी केली आहे. आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने देखील चालू हंगामात आर्चरला खरेदी केली होते, पण दुखापतीमुळे तो संघासोबत सहभागी होऊ शकला नाही.
ईसीबीने सांगितेल्याप्रमाणे, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनाची वेळ निश्चित नाहीये. बोर्ड याबाबतीत एखाद्या तज्ञाकडून सल्ला हघेणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रामाणे पाठीच्या खालच्या भाग ताणला गेल्यामुळे आर्चर इंग्लंड आणि ससेक्स संघाच्या आगामी मालिकांमधून माघार घेत आहे. तो कधी पुनरागमन करेल, याविषयी सध्या काहीच सांगता येणार नाहीये.
दरम्यान, आर्चर मागच्या १६ महिन्यांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याने २० मार्च २०२१ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यामध्ये इंग्लंडसमोर भारतीय संघ होता आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा टी-२० सामना पार पडला होता. आर्चरने २१ महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेट खेळला होता. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना १६ सप्टेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅनचेस्टरमध्ये खेळला होता. कसोटी क्रिकेटचा विचार केला, तर त्याने या प्रकारातील शेवटचा सामना २३ फेब्रुवारी २०२१ मध्ये खेळला होता. हा सामना देखील भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये पार पडला होता.
दुखापतीमुळे आर्चर मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक देखील खेळला नाही. त्याची किंमत इंग्लंड संघाला मोजावी लागली. इंग्लंडला उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात जर आर्चर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असता, तर परिस्थिती वेगळी असू शकत होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटवरील प्रेम म्हणा वा संघनिष्ठा! तब्येत बरी नसतानाही लखनऊसाठी खेळला एविन लुईस, ठरला गेमचेंजर
ऐकलंत का? १७ कोटींनीही नाही भरलं केएल राहुलचं मन, अर्ध्या हंगामात केली पगार वाढीची मागणी!
तेव्हा कुंबळे टेलरला म्हणाला होता ‘स्पिनर्सचा कर्दनकाळ’, वाचा न्यूजीलंडच्या दिग्गजाबद्दल सविस्तर