---Advertisement---

क्रिकेट जगतासाठी धक्कादायक बातमी; टीम इंडियाच्या या खेळाडूने केली आत्महत्या

On: गुरूवार, जून 20, 2024 3:22 PM
---Advertisement---

क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. वास्तविक, भारताचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सनने आत्महत्या केली आहे. डेव्हिड जॉन्सन हे अंदाजे 53 वर्षांचे होते. समोर आलेल्या माहितीनूसार, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याचे समजत आहे. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांनी  डेव्हिड जॉन्सनच्या आत्महत्येवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये दोघांनी डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मात्र, डेव्हिड जॉन्सनची कारकीर्द भारतासाठी फार काळ टिकली नाही. या खेळाडूने 10 ऑक्टोबर 1996 रोजी दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. तर डेव्हिड जॉन्सनने 26 डिसेंबर 1996 रोजी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो कधीही टीम इंडियासाठी खेळला नाही. पण देशांतर्गत क्रिकेट आणि इतर लीगमध्ये खेळत राहिले. मात्र, डेव्हिड जॉन्सनच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

डेव्हिड जॉन्सनने 2 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या खेळाडूने भारताकडून कसोटी सामन्यात 47.67 च्या सरासरीने 3 बळी घेतले. याशिवाय फलंदाज म्हणून डेव्हिड जॉन्सनने 4 च्या सरासरीने 8 धावा केल्या.

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अनिल कुंबळेने लिहिले आहे – माझा क्रिकेट सहकारी डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाच्या वृत्ताने मी दु:खी झालो आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स डेव्हिड जॉन्सनवर सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआय सचिव जय शहांनी पोस्ट मध्ये लिहले- आमचा माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन याच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांचे खेळातील योगदान सदैव स्मरणात राहील.

महत्तवाच्या बातम्या-

‘या’ खेळाडूला मिळणार संधी; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितला गेम प्लॅन
हे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील; सुपर-8 फेरी दरम्यान डेल स्टेनची आश्चर्यकारक भाविष्यवाणी समोर
सुपर-8 फेरीपूर्वी दोन्ही संघांना धोक्याची घंटा! भारत-अफगाणिस्तान सामन्यावर पावसाचे सावट?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---