क्रिकेटजगतातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज इजाज बट यांचे निधन झाले आहे. इजाज 85 वर्षांचे होते. विशेष म्हणजे, फलंदाजाव्यतिरिक्त ते पीसीबीचे अध्यक्षही राहिले होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. पीसीबीने अध्यक्ष, व्यवस्थापन समिती सदस्य, बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने दिग्गज कसोटी क्रिकेटपटूंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
खेळले होते फक्त 8 सामने
इजाज बट (Ijaz Butt) यांचा जन्म 10 मार्च, 1938 रोजी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. त्यांंनी 1959 ते 1962 यादरम्यान पाकिस्तानकडून फक्त 8 कसोटी सामने खेळले होते. तसेच, त्यांनी 2008 ते 2011 या कालावधीत पीसीबीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान क्रिकेट संघाने 2009मध्ये आयसीसी टी20 विश्वचषक जिंकण्याची मोठी कामगिरी केली होती.
पीसीबीची पोस्ट
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून इजाज बट यांच्या निधनाची (Ijaz Butt Died) माहिती दिली. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “माजी कसोटी क्रिकेटपटू आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष इजाज बट यांच्या निधनाच्या बातमीने पीसीबीला दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासाठी आमच्या संवेदना.”
The PCB is saddened by the news of the passing of former Test cricketer and ex-PCB chairman Ijaz Butt. Our heartfelt condolences to his family and friends. pic.twitter.com/EH0UuMBfhN
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 3, 2023
पाकिस्तान क्रिकेटवर शोककळा
पीसीबी अध्यक्ष जका अश्रफ यांनी इजाज बट यांच्या निधनावर शोक व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, “मी इजाज बट यांच्या निधनावर संवेदना व्यक्त करू इच्छितो. मला त्यांना वैयक्तिकरीत्या जाणून घेण्याचे भाग्य लाभले आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराव्यतिरिक्त आणखी काहीच नाहीये. मी इजाज बट यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच, त्यांना आश्वासन देतो की, पाकिस्तान क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांची नेहमीच आठवण काढली जाईल.”
इजाज बट यांची कारकीर्द
इजाज बट यांना पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्यांनी 1959 ते 1962 यादरम्यान फक्त 8 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी 16 डावात फलंदाजी करताना 19.93च्या सरासरीने 279 धावा केल्या होत्या. त्यात 1 अर्धशतकाचाही समावेश होता. 58 ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. (shocking pakistan former cricketer ijaz butt died at the age of 85 read here)
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या टी20 मध्ये वेस्ट इंडिजची सरशी! 150 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची घसरगुंडी
रियानने केली टीकाकारांची तोंडे बंद! देवधर ट्रॉफीत बनला ‘मॅन ऑफ द टुर्नामेंट’