आशिया चषकातील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी रंगला होता. परंतु, पावसाने या सामन्यात घोळ घातला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारतीय संघाच्या वरच्या फळीतल्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या चौघांनाही काही खास करता आले नाही. यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांनी उत्कृष्ट फलंदीजी केली. यावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपली प्रतिक्रीया दिला आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतो. आता त्याने शनिवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्या बाबत वक्तव्य केले आहे. याचा व्हीडिओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो म्हणाला की, “ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी खूपच चांगली फलंदीजी केली. ईशान प्रत्येक चेंडू संभाळून खेळत होता. ईशान आणि हार्दिक यांच्यात चांगली भागीदारी झाली. या दोघांनीही खुपच चांगली फंदाजी केली.”
अख्तर पुढे म्हणाला की, “या दोन फलंदाजांमुळे भारतीय संघ 266 धावांपर्यंत पोहचला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी खूपच चांगली गोलंदाजी केली. परंतु, त्यांनी अजून जोर लावायाला पाहिजे होता. जर पाकिस्तानने अजून चांगली गोलंदाजी केली असती तर, भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला असता.”
But we can't forget how @ishankishan51 & @hardikpandya7 rebuilt an inning which was in a complete disarray. pic.twitter.com/tjGXtG45yJ
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 2, 2023
भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ यांच्यातील सामना रद्द
भारतीय-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला सुरवातीलाच मोठे झटके बसले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने विराट कोहले आणि कर्णधार रोहित शर्माचे त्रिफळ उडवले. तर हॉरिस रौफ याने शुभमन गिल आणि श्रेयसला बाद केले. यामुळे भारतीय संघला ईशान आणि हार्दिक यांच्या चांगली भागीदारीममळे 266 धावा करता आल्या. परंतु पावसामुळे या सामन्यात पाकिस्तान संघाला फलंदाजीला येता आले नाही. यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. (Shoib Akhtar statment on india vs pakistan asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराटच्या विकेटमुळे भारतीयांचा जीव पडलेला भांड्यात, पण पाकिस्तानी दिग्गज म्हणतोय, ‘बरंच झालं…’
‘मैत्री बाहेर ठेवायची…’, IND-PAK खेळाडूंना चेष्टा-मस्करी करताना पाहून भडकला गंभीर, वाचाच