पाकिस्तानचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान त्यांच्या संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्याने मागच्या वर्षी देखील संघासाठी खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये मोलाची भूमिका पार पाडली आणि अनेकदा मॅच विनर देखील ठरला. मागच्या वर्षी पाकिस्तानने टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला पराभूत केले होते. रिझवानने या सामन्याविषयी मोठा खुलासा केला आहे.
मागच्या वर्षी पाकिस्तान संघाने टी-20 विश्वचषकात भारताला 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभूत केले. विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताविरुद्ध मिळवलेला पाकिस्तानचा पहिला विजय होता. या विजयानंतर पाकिस्तानी चाहते त्यांच्या खेळाडूंवर चांगलेच खुश आहेत. याच पार्श्वभूमीवर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने मोठा खुलासा केला आहे. रिझवानने सांगितल्यानुसार या वियानंतर पाकिस्तानमधील दुकानदार त्याच्याकडून पैसे घेण्यास नकार देऊ लागले आहेत. उभय संघांतील या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांनी नाबाद 152 धावांची भागीदारी करून विजय मिळवला.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद रिझवान याविषयी बोलत होता. संघासाठी सलामीला येणे आणि नंतर बाबरसोबत मोठी भागीदारी करणे, या गोष्टींमुळे त्याचे आयुष्यच बदलले आहे. त्याने सांगितले की, “विश्वचषकानंतर जेव्हा पाकिस्तानमध्ये परत आलो, तेव्हा मला या विजयाचे (भारताविरुद्ध) महत्व समजले. मी दुकानात खरेदी करण्यासाठी गेलो असताना, दुकानदारा पैसे घेण्यास स्पष्ट नकार देत होते. ते म्हणायचे, तुम्ही जा… मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही.”
“लोक म्हणायचे की, तुमच्यासाठी सर्वकाही मोफत आहे. या सामन्यानंतर सर्व पाकिस्तानी जनतेचे आमच्यावरील प्रेम वाढले होते,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला. मोहम्मद रिझवान सध्या पाकिस्तानच्या कसोटी संघाचा भाग आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो खेळत आहे. असे असले तरी, पाकिस्तान संघाचे या मालिकेतील प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने इंग्लंडने नावावर केले आहेत. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 17 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. (Shopkeepers refuse to accept money from Mohammad Rizwan since defeating India in T20 WC 2021)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठव्या क्रमांकावर अश्विनचाच जलवा! बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ठोकले अर्धशतक
पुरेपूर संधी असताना शतक हुकलेल्या पुजाराची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आता हे शतक…”