श्रेयस अय्यरला आवडतात हे ५ क्रिकेटर्स

भारतीय संघातील प्रतिभावान खेळाडू श्रेयस अय्यरने त्याचे ५ आवडते खेळाडू सांगितले आहेत. याच खेळाडूंमुळे क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळते, असेही अय्यर पुढे म्हणाला आहे.

सध्या भारतीय वनडे संघात अय्यरने आपलं स्थान जवळपास पक्कं केलं आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना तो संघाच्या धावसंख्येला बळकटी देण्याचं काम करतोय. या मुंबईकर खेळाडूकडे भविष्यातील भारतीय संघाचे कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे.

भारतीय संघ गेली काही वर्ष चौथ्या क्रमांकाच्या शोधात होता. अशातच अय्यरने आपली गुणवत्ता सिद्ध करत ही जागा पटकावली आहे.

आता याच अय्यरने आपल्या आवडत्या खेळाडूंबद्दल खुलासा केला आहे. ज्यात त्याने सचिन तेंडूलकर, केविन पीटरसन, विराट कोहली, रोहित शर्मा व एबी डिविलियर्स यांची नावं घेतली आहे.

तुझे लहानपणापासूनचे हिरो कोण आहेत, असा एका चाहत्याने अय्यरला ट्विटरवर प्रश्न विचारला होता. यावर अय्यरने माझे रोल माॅडेल सचिन तेंडूलकर, केविन पीटरसन, विराट कोहली, रोहित शर्मा व एबी डिविलियर्स असल्याचे म्हटले आहे.

सध्याच्या ट्रेडिंग बातम्या-

 या क्रिकेटरने सांगितले, कोरोना व्हायरसमुळे त्याला झालेले फायदे

सीएसके आणि आरसीबीमधील फरक त्याने सांगितला, याचमुळे आरसीबी जिंकत नाही आयपीएल

 अखेर फिरकीपटू आर अश्विनने बदललं आपलं नाव

 जिथं ऑलिंपिक्स नाही टिकलं तिथं आयपीएलचं काय घेऊन बसलाय

 टी२० विश्वचषकाची विकेट पडणं जवळपास पक्कं, या दिवशी होणार…

 टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब

You might also like