भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवीसय सामना रविवारी (9 ऑक्टोबर) रांचीमध्ये खेळला गेला. उभय संघातील या सामन्यात भारताला विजयासाठी 279 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावरील इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला क्षेयस अय्यर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. या दोघानी वैयक्तिक अर्धसतके केली, जे संघाची धावसंख्या उंचावण्यासाठी महत्वाचे ठरले.
इशान किशन (Ishan Kishan) याने 60 चेंडूत 50 धावा केल्या. तर श्रेयय अय्यर (Shreyas Iyer) याने अर्धशतक करण्यासाठी 50 चेंडूंचीच मदत घेतली. इशानने हे अर्धशतक अर्धशतकात 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने केले. तर श्रेयसच्या अर्धशतकात 7 चौकारांचा समावेश होता. हे दोघेही आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाचा भाग नसल्यामुळे त्यांनी याठिकाणी स्वतःची गुवत्ता दाखवून दिली, असे म्हणता येऊ शकते.
1⃣0⃣0⃣-run partnership! 💪 💪@ishankishan51 & @ShreyasIyer15 putting up a show. 👏 👏#TeamIndia 154/2 after 27 overs.
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKAJW7 #INDvSA pic.twitter.com/pSr6l48Biv
— BCCI (@BCCI) October 9, 2022
भारतीय संघाने या सामन्यातन नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने मर्यादित 50 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 278 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार शिखर धवन स्वस्तात बाद झाला. धवनने 20 चेंडूत 13 धावा केल्या आणि वेन पारनेलच्या चेंडूवर विकेट गमावली. त्याच्या साधीने डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला शुबमन गिनले देखील 28 धावांवर विकेट गमावली. गिलने एकूण 26 चेेंडू खेळले आणि कागिसो रबाडाच्या चेंडूवर बाद झाला.
तत्पूर्वी भारतासाठी वेगवागन गोलंदाज मोहम्मद सिराजने कौतुकास पात्र असे प्रदर्शन केले. त्याने टाकेलेल्या 10 षटकांमध्ये 3.80 च्या इकोनॉमीने 38 धावा केल्या आणि सर्वाधिक तीन विकेट्स देखील घेतल्या. आफ्रिकी संघासाठी रिझा हेंड्रिक्स आणि एडन मार्करम यांनी वादळी फलंदाजी केली. यादोघांनी अनुक्रमे 74 आणि 79 धावांची खेळी केली.
बातमी अपडेट होत आहे….
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकाच्या तयारीविषयी सूर्याचे महत्त्वाचे विधान; म्हणाला, ‘येथे येऊन आम्हाला…’
इंग्लंडने मारलं ऑस्ट्रेलियाचं मैदान! 11 वर्षांनंतर विरोधी संघाच्या धरतीवर जाऊन त्यांनाच चारली धूळ