आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ची रिटेंशन यादी जाहीर झाली तेव्हा कर्णधार श्रेयस अय्यरचे नाव त्यात समाविष्ट नव्हते. केकेआर संघाने श्रेयसला रिलीज केले आहे. त्यामुळे आता केकेआरला आगामी हंगामासाठी नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर श्रेयसला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वीही मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. अनेक फ्रँचायझी श्रेयसला त्यांच्या संघाचे नेतृत्व करण्याची ऑफर देत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझी श्रेयस अय्यरशी संपर्क साधत आहेत
माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रेयसला केकेआरने 27 ऑक्टोबरला संपर्क केला होता. फ्रँचायझीला श्रेयसला संघात कायम ठेवायचे होते, पण भारतीय खेळाडूला मोठी रक्कम हवी होती. त्यामुळे केकेआर आणि श्रेयस यांच्यात कोणताही करार होऊ शकला नाही. परिणामी श्रेयस आता मेगा लिलावात बोलीसाठी उतरणार आहे. अनेक मोठ्या फ्रँचायझी श्रेयसला खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. विशेष म्हणजे, बऱ्याचशा फ्रँचायझींना श्रेयसला कर्णधार म्हणून आपल्या ताफ्यात सामील करायचे आहे.
केकेआर व्यतिरिक्त अय्यरने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचेही नेतृत्वही केले आहे. 2020 मध्ये दिल्ली फ्रँचायझीने त्याच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. मात्र, अखेरच्या क्षणी विजेतेपद संघाच्या हातून निसटले. त्यानंतर आयपीएल 2024 मध्ये श्रेयसच्या नेतृत्वाखाली केकेआरने जबरदस्त कामगिरी केली आणि संघ आयपीएल ट्रॉफी उचलण्यात यशस्वी ठरला. आता आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात श्रेयसला कोणती फ्रँचायझी खरेदी करणार हे पाहणे बाकी आहे.
दुसरीकडे केकेआरने रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीबद्दल बोलायचे झाल्यास, फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी सहा खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यापैकी रिंकू सिंग, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रमणदीप सिंग यांना कायम ठेवण्यात आले आहे. केकेआरने सुनील नरेन आणि रसेलसारख्या परदेशी खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“तो जागतिक दर्जाचा खेळाडू पण…”, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे केएल राहुलला चँलेज
विराट आणि बाबर एकाच संघातून खेळणार, 17 वर्षांनंतर पुन्हा योगायोग जुळून येणार?
रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, माजी दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!