भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका (IND vs SL T20) खेळवली जात आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. सध्या टी२० मालिकेतून विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती दिली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) विराटऐवजी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) भारतीय संघात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीची संधी दिली आहे. भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी भारतीय संघात विराटऐवजी एका खेळाडूची निवड केली आहे. कोहलीला दुखापत झाल्यास श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकतो, असे ते म्हणाले आहेत.
कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने विश्रांती दिली आहे. आता भारतीय संघामध्ये कोहलीची जागा श्रेयस अय्यरने घेतली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टी२० संघासाठी भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजीबद्दल विचारले असता, संजय बांगर यांनी श्रेयस अय्यरला फलंदाजीच्या ३ क्रमांकावर विराटऐवजी निवडले आहे.
संजय बांगर म्हणाले की, “बेंच मजबूत होत आहे. श्रेयसला ज्या स्थितीत फलंदाजीसाठी पाठवले जात आहे, त्याला सतत तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास पाठवले गेले आहे. त्यामुळे जर एखाद्या सामन्यात विराट जखमी झाला, तर मला वाटते की तो एक चांगला पर्याय असू शकतो. तिसऱ्या क्रमांकासाठी कदाचित संघ व्यवस्थापनाची नजर श्रेयस अय्यरवर आहे.”
श्रेयसशिवाय भारतीय संघामध्ये मधल्या भागात फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि संजू सॅमसन हे खेळाडू आहेत. या खेळाडूंना संघात परत बोलावण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात सॅमसनला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
पहिल्या सामन्यात सलामीवीर इशान किशनच्या ८९ धावा आणि श्रेयस अय्यरच्या ५७ धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने २० षटकांत २ गडी गमावून १९९ धावा केल्या होत्या. गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांनी श्रीलंका संघातील प्रत्येकी दोन गडी बाद केले आणि संपूर्ण संघ २० षटकांत ६ बाद १३७ धावावरच थांबला. भारतीय संघाने हा सामना ६२ धावांनी जिंकला. या टी२० मालिकेचा दुसरा आणि तिसरा सामना सामना आता शनिवारी (२६ फेब्रुवारी) आणि रविवारी (२७ फेब्रुवारी) धरमशाला येथे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर