आज गुरुवार (18 जून) रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. तर टी20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी एकदिवसीय मालिकेसाठी कोलकाताला जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
2024च्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलं नव्हतं. परंतू आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी अय्यर पुनरागमन करताना दिसणार आहे. गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून संघात बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
2024च्या आयपीएल हंगामात गौतम गंभीर (Gautam Gambhir) केकेआरचा मुख्य प्रशिक्षक होता. तर श्रेयस अय्यर केकेआरची धुरा सांभाळत होता. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरनं 10 वर्षानंतरचा आयपीएल ट्राॅफीचा दुष्काळ संपवला. मात्र तरीही अय्यरची भारताच्या टी20 विश्वचषक संघात निवड झाली नव्हती. परंतू अय्यर पुन्हा एकदा गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षक पदाखाली खेळताना दिसणार आहे.
श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गील (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), रिषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर…!!!
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं रचला इतिहास! 30 वर्षापूर्वीचा रेकाॅर्ड काढला मोडीत
ठरलं…!!! भारताचे दोन दिग्गज खेळणार श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका