भारतीय संघाच्या मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने आपल्या शानदार खेळीने भारतीय निवड समितीला सातत्याने प्रश्न विचरत आहे. वास्तविक श्रेयस अय्यर रणजी ट्राॅफीत मुंबई विरुद्ध ओडिशा सामन्यात द्विशतक झळकावले आहे. या दुहेरी शतकासहत्याने त्याने नक्कीच निवड सामितीचे डोळे उघडले आहेत. कारण श्रेयस अय्यरला बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
श्रेयस अय्यरने आज (07 नोव्होंबर) गुरुवारी मुंबईतील बीकेसी ग्राऊंडवर ओडिशाविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपले सलग दुसरे शतक तिसऱ्या प्रथम श्रेणी द्विशतकात रूपांतरित केले. महाराष्ट्राविरुद्धच्या त्याच्या मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यने आपला जबरदस्त फॉर्म दाखवून दिला आहे. या बातमी आखेरीस तो 207 धावांवर नाबाद आहे. ज्यात त्याने 22 चाैकार आणि 8 षटकार ठोकले आहेत. आगामी ऑस्ट्रेलिया दाैऱ्यापूर्वी श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली नाही.
DOUBLE HUNDRED FOR SHREYAS IYER 💪
– Shreyas Iyer is making a huge statement, Double Hundred from just 201 balls against Odisha in Ranji Trophy and continuing his dream touch in domestic cricket 🔥 pic.twitter.com/gVdHO0GCoi
— Johns. (@CricCrazyJohns) November 7, 2024
अय्यरच्या शतकांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या त्याच्या आशा पुन्हा जागृत केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा इंग्लंडने भारताला भेट दिली तेव्हा तो संघाचा भाग होता. परंतु शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पाठीच्या समस्येमुळे त्याने विश्रांतीची निवड केली. तसेच त्याने अलीकडेच मीडियाशी बोलताना भारतीय संघात पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी तो म्हणाला, “मी पुनरागमनासाठी खूप उत्सुक आहे, मी माझी कामगिरी चांगली करण्यासाठी प्रयत्न करेन”.
हेही वाचा-
IND VS SA; दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचा दबदबा, असा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड
“सातत्याचा अभाव….”, संजू सॅमसनच्या फॉर्मबाबत अनिल कुंबळेची मोठी प्रतिक्रिया
INDA VS AUSA; केएल राहुल फ्लाॅप, ईश्वरन शून्यावर बाद, ऋतुराजकडूनही निराशा