भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला वनडे सामना २३ मार्च रोजी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला होता. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यरला फिल्डिंग करतांना दुखापत झाली होती. चेंडू अडवण्यासाठी डाइव्ह मारली असतांना त्याचा डावा खांदा दुखावला गेला होता. त्यानंतर त्याने मैदान सोडले होते व उर्वरित सामन्यात भाग देखील घेतला नव्हता.
सामन्यानंतर श्रेयसच्या दुखापतीच्या पुढील चाचण्या करण्यात आल्या. ज्यात ही दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेला मुकणार आहे. मात्र आता त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यर अजून काही महत्वाच्या सामन्यांना देखील मुकण्याची शक्यता आहे.
टी२० वर्ल्डकपलाही मुकण्याची शक्यता
श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे स्वरूप बघता त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ही शस्त्रक्रिया एप्रिल महिन्यात केली जाणार आहे. शस्त्रक्रिया केल्यास पुढील चार ते पाच महिने तरी त्याला दुखापतीतून सावरायला लागतील. तेवढा काळ त्याला क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहावे लागेल.
अशा परिस्थितीत आता श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेला तर मुकणार आहेच. मात्र त्यानंतर देखील आयपीएलच्या संपूर्ण हंगामातूनही तो बाहेर होऊ शकतो. मात्र इतकेच नव्हे तर भारतीय संघासाठी वाईट बातमी म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार्या टी२० वर्ल्डकपमधून श्रेयस अय्यरलि बाहेर व्हावे लागू शकते.
कदाचित श्रेयस टी२० वर्ल्डकपपर्यंत तंदुरुस्त देखील होईल. मात्र जर मधले काही महिने तो क्रिकेटपासून लांब असेल आणि आयपीएल सारख्या स्पर्धेत युवा खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली, तर त्याला संघातील आपली जागा टिकवणे, निश्चितच आव्हानात्मक असेल. आता अशा परिस्थितीत पुढे काय घडामोडी घडतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दे घुमा के! दुसऱ्या वनडेत रिषभ पंतचे ७ खणखणीत षटकार, पटाकावलं दुसरं स्थान
दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कर्णधार; ‘या’ खेळाडूचे नाव नेतृत्वासाठी आघाडीवर
रिषभ पंतबरोबर होत असलेल्या तुलनेबाबत केएल राहुलने सोडले मौन; दिले ‘असे’ सडेतोड उत्तर